Home Breaking News महिलांच्या सन्मानार्थ शितलताई भांगे मैदानात …

महिलांच्या सन्मानार्थ शितलताई भांगे मैदानात …

महिलांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी
9 मार्च रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत यामध्ये एसटी मधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात आली. आहे तसेच एस.टी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना असे नाव देण्यात आले आणि राज्यामध्ये एस टी महामंडळा कडुन ही योजना 17 मार्च पासून लागू करण्यात आली तसेच आशा वर्कर, मदतनीस,रोजगारसेवक,संगणकओपरेटर ,अंगणवाडी सेविका आश्या अनेक पद भरती वेतनात वाढ करून मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने महिलांसाठी योग्य निर्णय घेतल्याबद्दल आज हादगाव बस स्थानक येथे सामाजिक कार्यकर्त्या शितल भांगे पाटील, व शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसनिकर, दुर्गा भारती , जयश्री पतंगे, बाबुराव कदम, मारोती काकडे, आणि शिवसेनेचे हादगाव शहरातील सर्व पदाधिकारी यांच्या वतीने बस स्थानकामध्ये महिलांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला उपस्थित सर्व महिलांनी मुख्यमंत्री शिंदे साहेब व महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आभार मानले आहेत

Previous articleवंचित बहुजन आघाडी पातूर तर्फे अतिवृष्टी झालेल्या भागाचा तात्काळ सर्वे करून सरसकट भरपाई देण्यासाठी पातूर तहसीलदार यांना निवेदन
Next articleव्याख्याते प्रा.यशपाल भिंगे यांचा नाशिक येथे नागरी सत्कार संपन्न.