Home कृषीजागर वंचित बहुजन आघाडी पातूर तर्फे अतिवृष्टी झालेल्या भागाचा तात्काळ सर्वे करून सरसकट...

वंचित बहुजन आघाडी पातूर तर्फे अतिवृष्टी झालेल्या भागाचा तात्काळ सर्वे करून सरसकट भरपाई देण्यासाठी पातूर तहसीलदार यांना निवेदन

निलेश हिवराळे कार्यकारी संपादक (साप्ताहिक  भूमीराजा) यांची माहिती

पातुर तालुक्यात कोठारी, खानापूर,आस्टुल,पास्टुल, भागात काल संध्याकाळी चार ते सहा च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारांमुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे शेतकरी मेटा कुटीस आला आहे शेतकऱ्यांनी जगावे की मरावे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे अशातच वंचित बहुजन आघाडी पातुरतर्फे अतिवृष्टी झालेल्या गावाचा दौरा करण्यात आला आणि नुस्कान झालेल्या भागाची पाहणी करण्यात आली शेतकऱ्यांना भेटी देण्यात आल्या व वंचित बहुजन आघाडी पातुरतर्फे होईल ते मदत करण्याचे आश्वासन पातुर तालुकाध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ यांनी केले आहे यावेळी प्रमुख उपस्थित जि.प. उपाध्यक्ष सुनीलभाऊ फाटकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर घेत तात्काळ सर्वे करून नुकसान झालेल्या जमिनीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले

यावेळी त्यांच्यासमवेत जि.प. सदस्य सवित्रिताई राठोड, विनोदभाऊ देशमुख पंचायत समिती सभापती सुनिताताई टप्पे, स्वातीताई इंगळे, हिरसिंगभाऊ राठोड, राजुभाऊ बोरकर,पं.स. सदस्यपती अर्जूनभाऊ टप्पे,हरिभाऊ इंगोले, अनिलभाऊ राठोड, राणाभाऊ डाबेराव, संजूभाऊ लोखंडे,संतोष तिवाले, विलास घुगे, जगदीश इंगळे,नागेश करवते,नितेश हिवराळे बाळू उगले,अशोक इंगळे राजेंद्र इंगळे,शैलेश देशमुख,शरद सुरवाडे, आदी वंचित चे कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleएस आय एस व अतुल सिरसाट(युवा नेता काँग्रेस पार्टी खामगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा भरतीचा नियुक्ती
Next articleमहिलांच्या सन्मानार्थ शितलताई भांगे मैदानात …