जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 8 एप्रिल 2026
हिमायतनगर तालुक्यांत शेतक-यावरील संकटे संपता सपेनात आधी अवकाळी पाऊस आणी आता विजेचा लपंडाव त्यामुळे शेतक-यांच्या शेतातील ऊन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तेलवर्गीय पिक म्हणुन तिळ पिकांची पेरणी दरवर्षी करतो..त्याचबरोबर ज्वारी, उन्हाळी मुग, भाजीपाला आदी पिके शेतक-यांनी यावर्षी घेतलेली असतांना विद्युत पंप चालु केल्या केल्या अवघ्या पाच मिनीटात लाईट जात आहे…या आठवड्यात दिवसा लाईटचा हप्ता आहे..पण लाईट पाच मिनीट सुध्दा टिकत नाही..कुठे फाॅल्ट झाला हे सोमवारपासुन आजरोजी मिळत नाही.
या विजेच्या लंपडावामुळे अक्षरक्षा शेतक-यांची करपली आहेत..त्यामुळे तालुक्यातील शेतक-यांनी वेळीच लाईटचा फाॅल्ट नाही काढला तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे…



