Home Breaking News *”जय किसान फार्मर्स फोरमच्या “कृषी गौरव” पुरस्कारांचे १० एप्रिलला नाशिकमध्ये वितरण”*

*”जय किसान फार्मर्स फोरमच्या “कृषी गौरव” पुरस्कारांचे १० एप्रिलला नाशिकमध्ये वितरण”*

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमीराजा न्युज
मो. नंबर – 8983319070

*मा. आबासाहेब मोरे यांच्या शुभहस्ते ३८ शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान”*

*नाशिक-*

भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त निमित्त १० एप्रिलला प. सा. नाट्यगृह, सार्वजनिक वाचनालय, नाशिक येथे स.११.३० वाजता मा. आबासाहेब मोरे, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरी यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३८ शेतकऱ्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ जयराम पूरकर, जि. प. चे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, गावखेती चे संशोधक डॉ इंजि अर्जून तोरवणे, आनंद अग्रो समुहाचे उध्दव आप्पा आहेर, विविध भारतीचे राष्ट्रीय सेवा प्रमुख डॉ. संतोष जाधव, सेंद्रिय शेतीतज्ञ सदुभाऊ शेळके, ज्येष्ठ उद्योजक पांडुरंग चव्हाण, उद्योजक रमेश पाटील आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे, अशी माहिती जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय जाधव यांनी दिली.

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये संजय वाघ, नारायण निकम, ज्ञानेश्वर आहेर, कडू आहेर, प्रकाश ढाकणे, भागवत लावंड, दिगंबर माने, अमित पाटील, संदिप टोचर, प्रकाश गडदे, ज्ञानेश्वर सपाटे, संतोष पवार, धनंजय जगताप, ज्ञानेश्वर भिसडे, संजय लाड, अविनाश खताळ, भागवत ठाकरे, चंद्रकांत दळवे, गणेश पवार, राहूल गीते, सोपान शेळके, विकास फेपाळे, कारभारी गांगुर्डे, विजयसिंग सूर्यवंशी, आप्पासाहेब शेळके, राजाराम पवार, जयंत भोये(महाराज), देविदास गावित, नारायण शिंदे, ज्ञानेश्वर पवार, जनार्दन गायकवाड, किशोर वाडेकर, नवनाथ जानकर, राकेश निकम, धनलक्ष्मी इंडस्ट्रीज अँड मार्केटिंग, रामराव भालेराव, नितीन आहेर, विलास पाटील (शेवाळे), जावेद पठाण यांचा समावेश आहे. ट्राफी, पैठणी साडी, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

यावेळी सेंद्रिय शेतीवर चर्चासत्र तसेच ‘जैविक कीडनियंत्रण’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. प्रसिद्ध गायिका सुखदा महाजन यांचा सुमधुर गितांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून प्रसिद्ध निवेदक व कलावंत तुषार वाघुळदे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणार आहे.

शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ लामखडे, गोरक्षनाथ जाधव, भगवान खरे, उत्तम रौंदळ, निवृत्ती न्याहारकर, मयुर गऊल, सविता जाधव, शाम गोसावी, वसंत आहेर, संतोष केदारे, प्रशांत दिंडे, नाना पाटील, बाळासाहेब मते, गणेश पाटील, संदीप काळे, सुनिल निकम, सागर रहाणे, राजेंद्र धोंडगे, सुयोग जाधव, संकेत लामखडे, शांताराम कमानकर, संदीप उफाडे, सुनिल गमे, हेमंत शिंदे, पुंजाजी मालुंजकर, दीपक खोडे, आदिंनी केले आहे.

Previous articleविजेच्या लंपडावामुळे शेतक-यांचे पिके करपली…
Next articleमौजे किनी येथील सौ. सुजाता त्रिपनरेडी मुत्यलवाड यांना जिल्हा मध्यवर्ती बॅकेला मतदानाचा सर्वानुमते दिला अधिकार .‌…