Home Breaking News *जिंदगी, आयुष्य, जीवन*

*जिंदगी, आयुष्य, जीवन*

…..✍️ जिल्हा संपादक नांदेड

एकदा एका राज्यात एक राजा फार मोठ्या द्विधा मनःस्थितीत होता.त्याला काही प्रश्न पडले होते आणि त्याची उत्तरे ही त्याला मिळत नव्हती एक दिवस राज्य दरबार भरला असताना त्याने आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भर सभेत दरबारात सर्वात हुशार असलेल्या आपल्या वजिराला समोर बोलावले आणि सांगितले की मला तीन प्रश्न पडलेले आहेत आणि त्याची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील, त्यासाठी मी तुला एक महिन्यांचा कालावधी देतो. या तीस दिवसात जर तू मला माझ्या प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत तर तुला प्राणाला मुकावे लागेल परंतु जर या प्रश्नाची उत्तरे बरोबर मिळाली तर तुला अर्धे राज्य देण्यात येईल. वजीर एकदम काळजीत पडला आणि विचार करू लागला. आपल्या बुध्दीची खरी ओळख किंवा क्षमता आता लागणार होती हे त्याला समजले, एवढेच काय जर उत्तर मिळाले नाही तर जीवही गमवावा लागणार होता. त्यामुळे तो धास्तवून गेला होता. परंतु नाईलाज होता कारण ही राजाची आज्ञा होती आणि ती टाळता येणार नव्हती. शेवटी नाईलाजाने का होईना वजिराने राजाला प्रश्न विचारण्यास सांगितले.

राजाने सांगितले की माझे तीन प्रश्न लिहून घे आणि त्याची एकदम योग्य उत्तरे मला तीस दिवसात दे

*प्रश्न पहिला -* माणसाच्या जीवनातील सर्वात मोठे सत्य काय?
*प्रश्न दुसरा -* माणसाच्या जीवनात माणसाला सर्वात मोठा धोखा कोणता?
*प्रश्न तिसरा -* माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी कोणती?

असे तीन प्रश्न विचारल्यानंतर राजाने वजिराला सांगितले की उद्या सकाळ पासून तुझे तीस दिवसांचा कालावधी चालू होतो आहे मग वजीर प्रश्न लिहिलेला कागद घेऊन दरबारातून बाहेर पडला आणि साधू, संत, महंत आणि राज्यातील बऱ्याच हुशार लोकांशी चर्चा केली परंतु त्याला त्याच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत हळूहळू दिवस पुढे ढकलत होते आणि वाजिराची काळजी वाढत चालली होती राजाच्या तीन प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तो मजल दर मजल एका गावाजवळच्या जंगलात पोहचला. उत्तरे शोधण्यासाठीची मुदत जवळजवळ शेवटचे दोन दिवस उरली होती.

आता मात्र वजिराला आपला मृत्यू दिसत होता कारण शेवटचा एक दिवस बाकी असताना त्या जंगलात रात्रीच्या वेळी वाजिरला एक झोपडी दिसली आणि त्याने त्या झोपडी कडे आपली पावली वळवली. तेंव्हा झोपडीत एक कुत्रे एका पेल्यात ठेवलेले दूध जीभ बाहेर काढून मोठ्या चविष्ट पद्ध्तीने मोठा मोठा आवाज काढून पित होते आणि त्या झोपडीत एक वृद्ध व्यक्ती अगदी मजेत बसलेले होते आणि प्रसन्न चेहऱ्याने माझ्याकडे बघून स्मित हास्य दाखवीत पाण्यात भिजवून भाकरीचे तुकडे खात होते. त्यांची ती अवस्था बघितल्यावर असे वाटले की एवढा गरीब माणूस परंतु तरीही फार समाधानी आहे. वजिराला पाहिल्यावर त्यांनी सरळ सांगितले “या आता मध्ये या आणि बसा मला तुमच्या तीनही प्रश्नांची उत्तरे माहित आहे. आणि ती मी तुम्हाला देईन परंतु पहिली दोन उत्तरे मी तुम्हाला फुकट सांगेन परंतु तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र एका अटीवर देईन ती तुम्हाला मान्य असेल तरच आपण पुढे बोलुयात.”

हे ऐकल्यानंतर वाजिराला धक्काच बसला की या व्यक्तीला हे सर्व कसे माहित आहे की मी काही प्रश्नाची उत्तरे शोधत येथपर्यंत आलो होतो.माझे प्रश्न काय आहेत हे यांना कसे माहित असेल? याचा विचार करत असतानाच ती वृध्द व्यक्ती जोरात हसली आणि म्हणाली जर तुला अटी मान्य असतील तर तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी लगेच देतो.

वजिराने जरा विचार केला जर आपण उत्तरे शोधली नाहीत तर उद्या राजा आपले मस्तक उडविणार आहेच म्हणजे मृत्यू अटल आहेच. मग कोणताही विचार न करता वजिरानी त्या व्यक्तीच्या अटी मान्य करून हो म्हंटले.

पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे *मृत्यू* कारण माणसाच्या जीवनात सर्वात सत्य आहे तो मृत्यू. कारण तो अटळ आहे आणि प्रत्येकाला येणार आहे. गरीब, श्रीमंत, राजा, रंक, फकीर, संत, महात्मे प्रत्येकाला मृत्यू हा येणारच.

आता दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर आहे जीवन माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठा धोखा आहे तो म्हणजे जीवनच माणूस जीवनात खोटं,चुकीचे कर्म आणि फसवणूक ही नेहमी धोखा देणारीच असतात. अर्थात माणसाचे जीवनच कायम धोकादायक असते.

आता तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यापूर्वी वाजिराने आपल्या वायद्या प्रमाणे त्या वृध्द व्यक्तीला विचारले तुमची काय अट आहे .
तेंव्हा त्या वृद्धाने सांगितले की त्या कुत्र्याच्या पेल्यातील दूध तुम्हाला प्यायचे आहे. वजीर एकदम उद्विग्न झाला विचारात पडला. अतिशय संतापाने म्हंटला की मी हे दूध पिऊ शकत नाही. परंतु उद्या राजाच्या दरबारात आपल्या मृत्यूचे स्वप्न ही पाहू लागला. मग मात्र थोडेसे शांत होत त्यांनी डोळे बंद करून त्या कुत्र्याच्या पेल्यातील दूध घटाघट पिऊन टाकले..
लगेचच त्या वृद्धाने तिसऱ्या अंतिम प्रश्नाचे उत्तर दिले *गरज* माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याची गरज म्हणजे इच्छा नसतानाही एखादी गोष्ट करायला लागणे जसे तुम्ही आता केले. आपला मृत्यू वाचविण्यासाठी एका कुत्र्याच्या पेल्यातील उष्टे दूध तुम्हाला प्यावे लागले. गरज माणसाला काहीही करायला लावते. आता मात्र वजीर खूष झाला आणि त्या वृध्द व्यक्तीच्या पाया पडून तेथून निघाला आणि दुसऱ्या दिवशी राजाला दरबारात तीनही प्रश्नांची उत्तरे दिली.

राजा फार खूष झाला आणि ठरल्याप्रमाणे त्याने अर्धे राज्य वाजीराला देऊन टाकले.

*📍बोध :*
जेव्हां जन्म होतो तेव्हाच मृत्य ठरलेला असतो हे त्रिकालबाधित सत्य आहे. तर जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास म्हणजेच जिंदगी (आयुष्य) जे फक्त पावलापावलावर धोकानेच भरलेले आहे आणि या जीवनात गरज हीच माणसाची खरी कमजोरी आहे.तेव्हा सदैव प्रसन्न रहा आणि जे प्राप्त आहे त्यात समाधान मानून जगा.

Previous articleराष्ट्रीय यादव महासभेच्या महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष पदी अभिषेक बकेवाड यांची निवड*
Next articleगोदावरी अर्बन शाखेचा तामसा नगरीत कार्यारंभ