Home Breaking News दोन वर्षांच्या कार्यकाळातील केलेली सेवा सदैव स्मरणात राहील..

दोन वर्षांच्या कार्यकाळातील केलेली सेवा सदैव स्मरणात राहील..

👉 स्वप्नील आखाडे शाखा प्रबंधक

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 31 आॅगष्ट 2022

हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी स्वप्नील आखाडे यांची नुकतीच भंडारा येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर नवनिर्वाचित शाखा प्रबंधक अमय बर्वे हे रुजु झाले आहेत.
नव्याने आलेले शाखा प्रबंधक अमय बर्वे आणि बदली होऊन गेलेले स्वप्निल आखाडे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळावे यासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी जी निर्माण झाली होती. त्या परीस्थितीवर नविन तोडगा काढला. आणि बॅंकेतुन दलालांची हकालपू केली. आखाडे सरांनी प्रत्यक्ष गावातील ग्रामपंचायतला भेट देऊन, शेतकऱ्यांना पिक कर्ज याविषयी आणि बॅंकेच्या अन्य योजनांची माहिती दिली. सरांनी पिक कर्जाच्या फाईल गावातील सरपंचा कडेच जमा करून द्या. असे सांगितले.
नुकतीच त्यांची बदली भंडारा येथे झाली आहे. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना ते म्हणाले हिमायतनगर बॅंकेत केलेली दोन केलेली सेवा आणि तुम्ही दिलेले प्रेम सदैव स्मरणात राहील असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी उपस्थित प्रसंगी एकघरीचे संरपंच सुनील शिरोडे, उपसरपंच वसंत जाधव, भिमराव राऊत, जिल्हा संपादक मारोती अक्कलवाड, तालुका प्रतिनिधी अंगद सुरोशे आदी शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleमविप्र ‘ मध्ये 20 वर्षानंतर ‘ परिवर्तन ‘ – – – – मात्र अध्यक्ष पदाचा अपवाद
Next articleमहावितरणच्या मदतीविणा शेतकऱ्यांनी स्व-खर्चाने पोल उभा केला.