Home Breaking News रामकुंड पंचवटी येथे 31मे होणार भव्य दिव्य अहिल्या जन्मोत्सव…नियोजन बैठक

रामकुंड पंचवटी येथे 31मे होणार भव्य दिव्य अहिल्या जन्मोत्सव…नियोजन बैठक

हेमंत शिंदे नाशिक: हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

महाआरती, अहिल्या आरती व गंगा गोदावरी आरती.

धर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती नाशिक आयोजित दर वर्षी प्रमाणे याही वर्षी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवानिमित्त भव्य दिव्य सोहळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात होणार आहे. नासिक मध्ये रामकुंड पंचवटी या ठिकाणी 31 मे रोजी सायंकाळी सात वाजता अहिल्या आरती व गंगा गोदावरी आरती चे नियोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त साधु संत,पुरोहित महासंघ, राजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील, मान्यवर उपस्थित राहणार आहे. नाशिक जिल्ह्यात यावर्षी प्रथमच अहिल्यादेवी होळकर यांच्या 51 मूर्तींची वाटप करून भव्य दिव्य सोहळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खेडोपाडी ग्रामपंचायत मध्ये अठरापगड जातींना एकत्र घेऊन हे सोहळे होणार आहे. नासिक सिटी मध्ये पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या ठिकाणी समित्या स्थापन करून दिवसभर अनेक सांस्कृतिक ढोल पथक व्याख्यान स्वरूपात सुळे घेण्याची नियोजन समितीमार्फत करण्यात आले आहे, यावर्षी नवीनच गंगापूर रोड येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती गंगापूर रोड या समितीची स्थापना करून या ठिकाणी सोय होणार आहे. यावर्षी समितीचे अध्यक्ष पदाची नियुक्ती करण्यात आली अध्यक्ष पद श्याम भाऊ गोसावी तर उपाध्यक्ष राजाभाऊ बदाड देवराम भाऊ रोकडे स्वागत अध्यक्ष ऋषिकेश ढापसे,वैभव भाऊ रोकडे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ ढेपले,कल्पेश शिंदे, अमोल भाऊ गजभार व प्रशांत बागल यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.. गंगापूर रोड येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समिती चे पंढरीनाथ कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षपदी मुंजाभाऊ ढोले, उपाध्यक्ष सचिन तालडे, सचिव भागवत लिंगुळे, खजिनदार रामेश्वर खनपटे कोषगार ओमकार तिथे, कार्याध्यक्ष,ज्ञानेश्वर बोबडे, मार्गदर्शक बालाजी कोरडे, सदस्य, रामेश्वर उन्हाने, प्रभाकर कानडे यांची नियुक्ती करण्यात आली.
. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षात प्रथमच 51 मूर्तींची वाटप करून भव्य दिव्य सोहळा साजरा होणार आहे पुढील वर्षी मातोश्री चा जन्मोत्सवासाठी 300 वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्त एकूण तीनशे मूर्ती वाटप करून जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचा संकल्प समितीच्या वतीने श्री समाधान भाऊ बागल यांच्या वतीने करण्यात आला आहे. मातोश्रींचा इतिहास सर्वधर्म सर्व समाजात पोहोचावा अठरापगड जातींनी एकत्र येऊन साजरा करावा या उद्देशाने ग्रामपंचायत मध्ये विविध संघटनांना मूर्तीचे वाटप करण्यात येत आहे. या सोहळ्याची साक्षीदार होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी होका प्रेमी प्रेमी अशी अठरापगड जातीतील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या सोहळ्याचा साक्षीदार व्हाव. अशी आव्हान करण्यात आले आहे.
31 मे रोजी सकाळी 9 वाजता प्रसाद सर्कल येथे भव्य रक्तदान शिबिर, 10 वाजता रामदास काळे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे सायंकाळी सात वाजता रामकुंड पंचवटी या ठिकाणी भव्य महाआरती गंगा गोदावरी आरती व अहिल्या आरती होणार आहे. त्यानंतर व्याख्यानाचा सोहळा होणार आहे त्यानंतर आठ ते दहा या दरम्यान भव्य अशी ढोल पथक मिरवणूक गंगा गोदावरी घाट ते प्रसाद सर्कल यादरम्यान होणार आहे तरी या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सोहळ्या ची शोभा वाढवण्यासाठी. आपण सर्व नाशिक जिल्ह्यातील व नाशिक सिटी मधील होळकर प्रेमी शिवप्रेमी प्रेमी भीम प्रेमी हिंदुत्ववादी संघटना, पुरोहित महासंघ,व अठरापगड जातीतील जनतेने एकत्र येऊन या सोहळा चे साक्षीदार व्हावी.

Previous articleधानोरा उपकेंद्र टीम ची बोरगडी तांडा २ येथे डेंगू रोगाची साथ निर्मूलनाच्या दृष्टीने तातडीने उपाय योजना … ..!
Next articleग्रामीण भागात देशी दारुचा महापुर! 👉 अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.