Home Breaking News आर. डी. रणवीर यांची उपविभागीय कृषि अधिकारी किनवट पदी पदोन्नती.

आर. डी. रणवीर यांची उपविभागीय कृषि अधिकारी किनवट पदी पदोन्नती.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 17 मे 2023

हदगांव तालुका कृषी अधिकारी व सध्या प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले, कृषि क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आर. डी. रणविर यांची किनवट येथील कृषी उपविभागीय कृषी अधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल हिमायतनगर, हदगाव तालुक्याचे लोकप्रिय, विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भ्रमणध्वनीवर शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सरपंच,चेअरमन, संरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष, कृ.उ. बा. समितीचे संचालक, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रभारी तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, संचालक दिलीपराव अनगुलवार, राजीव अनगुलवार, पत्रकार मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर आदीनी रणविर यांना भ्रमणध्वनीवर शुभेच्छा दिल्या आहेत.
किनवट उपविभागीय कृषी अधिकारी रणविर साहेब यांची नियुक्ती होतांच हिमायतनगर, उमरी, भोकर, हदगाव, किंनवट, माहुर या तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला.
शेतकऱ्यांना विविध कृषि योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलाच अडथळा निर्माण होऊ नये, अशी मागणी शेतकरी बांधवांनी बोलवुन दाखविली आहे.

Previous articleहिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ताडेवाड तर उपसभापतीपदी कदम यांची एकमताने निवड.
Next articleभोकर कृ. उ. बा. समितीच्या सभापतीपदी भोसीकर तर उपसभापतीपदी शामणवाड पाटील.