Home Breaking News हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ताडेवाड तर उपसभापतीपदी कदम यांची एकमताने...

हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ताडेवाड तर उपसभापतीपदी कदम यांची एकमताने निवड.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 17 हे 2023

हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापदासाठी आज 17 हे रोजी निवड करण्यात आली. हदगाव हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली हि निवडणूक लढविली होती. 28 मे रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. त्यानंतर सर्व तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सभापती आणि उपसभापती पदासाठी 17 मे रोजी सकाळी 10 वाजता आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सर्व संचालक मंडळाची बैठक घेऊन, तालुका काॅग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष जनार्दन रामचंद्र ताडेवाड आणि उपसभापती पदासाठी रमेश कदम डोलारीकर यांची निवड करण्यात आली आहे. सर्वच मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आहे. अतिशय शांत, संयमी, अभ्यासु असणारे ताडेवाड यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कामे करत शेतमालाचा लीलाव ( बिट) पध्दतीने सुरू करुन, बळीराजाला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

Previous articleपुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पुष्परत्न साहित्य समूह नाशिक प्रथम वर्धापन दिन सोहळा व पुरस्कार सोहळा
Next articleआर. डी. रणवीर यांची उपविभागीय कृषि अधिकारी किनवट पदी पदोन्नती.