Home Breaking News मविप्र ‘ मध्ये 20 वर्षानंतर ‘ परिवर्तन ‘ – – – –...

मविप्र ‘ मध्ये 20 वर्षानंतर ‘ परिवर्तन ‘ – – – – मात्र अध्यक्ष पदाचा अपवाद

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची व नाशिक जिल्हयातील प्रथम शैक्षणिक संस्था म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकित रात्री उशिराचा कल हाती येई पर्यंत अध्यक्ष पदाचा अपवाद वगळता बहुसंख्य पदावर परिवर्तनच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली होती.
प्रगती आणि परिवर्तन या दोन्ही पैनलच्या उमेदवारांमध्ये रात्री अकरा पर्यंत अटीतटीची लढ त सुरु होती. कार्यकारणीतील 6 पदाधिकाऱ्याच्या निवडणुकीत प्रगती पैनलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावरील उमेदवार आघाडीवर होते. तर सरचिटणीस या महत्वाच्या पदासह सभापती, उपसभापती, चिटणीस या पदावर परिवर्तनच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती.21 जागा पैकी 11 जागा वर साहाव्या फेरी अखेर परिवर्तन पैनलचे उमेदवार आघाडीवर होते. हाच कल कायम राहिल्यास ‘मविप्र’ मध्ये वीस वर्षा नंतर परिववर्तन होऊन नितिन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पैनल सत्तेत येणार आहे.
अखेरचे वृत्त हाती आले असून सरचिटणीस या महत्वाच्या पदावर नितिन ठाकरे हे 302 मतानी विजयी झाले असून 21 जागा पैकी 20 जागा वर परिवर्तन नी विजयी आघाडी घेतली आहे व परिवर्तन पैनलच्या विजया वर शिक्कामोर्तब झाले आहे.

Previous articleमनावरील ताण कमी करण्यासाठी…
Next articleदोन वर्षांच्या कार्यकाळातील केलेली सेवा सदैव स्मरणात राहील..