Home Breaking News लाईनमनच्या हलगर्जीपणास जनता वैतागली

लाईनमनच्या हलगर्जीपणास जनता वैतागली

परभणी, ( जिल्हा प्रतिनिधी) :- पूर्णा तालूक्यातील पांगरा लासीना येथे सध्या कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण खात्याचे लाईनमन यांच्या कमालीच्या हलगर्जीपणास गावातील जनता वैतागली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

येथे एक गावठाणचा रोहित्र ( डि पी) गत काही दिवसापासून जळून नादुरुस्त होता. त्यामुळे गावातील काही घरी विद्यूत पुरवठा खंडीत होता. उष्णता उकाड्याचे वातावरण असल्याने नागरिक व विद्यार्थी हैराण होते. यातच “त्या” रोहित्र वरुन ज्या घरांना विद्यूत पुरवठा होतो. अशा मिटरधारक ग्राहक नागरीकाकडून विज वापर बिले वसूल करण्यात आले. शिवाय, काही ठिकाणी मिटर नसताना आकडे टाकून विजेची चोरी होते. अशांना कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत. डि पी जळाला त्या वेळी केवळ प्राथमिकता फिस म्हणून सर्वा सोबत काही रक्कम दिली की, डि पी बसवल्यावर त्यांची विज चालू होते. मग मात्र बिल भरण्याची गरज नाही. फुकट विज वापर. तर या उलट चालू मिटरधारक महिनेवारी बिले भरुन परेशान असून त्यांना नियमित विज पुरवठा नाही.

यातच, काहींचे मिटर थकबाकी मुळे बंद पडलेत. असे बरेच जण विद्यूत चोरी करतात. याकडे जाणिवपूर्वक सध्या कार्यरत असलेले लाईनमन कानाडोळा करुन नियमित विज बिले भरणारास वसूलीचा तगादा लावून हैराण करीत आहेत. बिले भरुनही विज चोरी करणा-यामुळे डि पी वर लोड येवून सदर डि पी जळत आहेत किंवा केबल जळणे, डिओ, फ्युज जाणे अशा बिघाडाने नियमित विज बिले भरणारास नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

यास खुद्द लाईमनचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याची ओरड जाणकार नागरीक माधव किशनराव ढोणे यासह चालू मिटरधारक आणि गावक-यातून ऐकू येत असून लाईनमनच्या मनमानी, हलगर्जीपणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करुन त्यांची त्वरित बदली करण्याची मागणी देखील ग्राहकातून जोर धरीत आहे.

Previous articleसोसायटी सचिवाची प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपतालुका प्रमुखास मारहाण
Next articleसहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदावरुन डॉ प्रभाकर कवठेकर 30 जून रोजी होताहेत सेवानिवृत्त