Home Breaking News ” पत्रकार कार्यगैारव सोहळा 2023 ” उत्साहात साजरा

” पत्रकार कार्यगैारव सोहळा 2023 ” उत्साहात साजरा

देशभक्ति पर मधुर गीतांनी कार्यक्रमात आणली रंगत

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

नाशिक (दि. २७ जानेवारी) – नागरिक – ग्राहक हक्क व संरक्षण कायद्याच्या जनजागृतीसाठी निस्वार्थ, नि:शुल्क व निरंतर कार्यरत असणाऱ्या शासन नोंदणीकृत नेक्स्टजन फाऊंडेशन संचलित सक्षम ग्राहक जागरूकता मंच व सर्व प्रकारच्या जाहिरात व इव्हेंटस क्षेत्रातील सुप्रसिद्ध, अग्रगण्य असलेल्या देवयानी ॲड व्हिजन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमत्त “सक्षम पत्रकार कार्य गौरव सोहळा २०२३” व सुमधुर देशभक्ती गीतांची मैफल असा अभिनव कार्यक्रम दि. २६ जानेवारी २०२३ रोजी क्रांतिवीर वसंतराव नाईक इंजि. कॉलेज सभागृह, डोंगरे वस्तीगृह, नाशिक येथे उत्सात पार पडला.

सदर कार्यक्रमात ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून साईबाबा हार्ट इंस्टीट्यूटचे संचालक प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, दि नाशिक जिल्हा महिला बँकेच्या चेअरमन डॉ. शशिताई अहिरे, क्रां. व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी, दिव्यांगसेवक मा. दत्तू बोडके, सागर क्लासेसचे संचालक मा. सुनील रूनवाल, स्पंदन हेलथकेअरच्या संचालिका व व्याख्यात्या लेखिका डॉ. आशालता देवळीकर, सहकार भारतीच्या शोभाताई सोनवणे, सौंदर्यवती श्रुती कऱ्हेकर, व्हीजन अकॅडमीच्या संचालिका रूपाली आवारे, संजीवनी होमिओपॅथी क्लिनिकच्या संचालिका योगविद्या तज्ञ डॉ. निवेदिता खोत, कार्यक्रमाचे आयोजक सक्षम ग्राहक जागरूकता मंचाचे संस्थापक अध्यक्ष राजेश आंधळे व देवयानी अॅड व्हीजनच्या संचालिका ज्योती सोनवणे, नाशिक एनजीओ समूहाचे सदस्य व दैनिक, ईलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे संपादक, पत्रकार, प्रतिनिधी इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

पत्रकार गौरवार्थी : मा. प्रशांत खरोटे, मा. धनंजय बोडके, मा. श्रीधर गायधनी मा. पल्लवी शुक्ल, मा. सुधीर बेंडकुळे, मा. अश्विनी पांडे, मा. प्रकाश उखाडे, मा. हेमंत शिंदे, मा. सुनील बेलदार

विशेष गौरवार्थी : डॉ. नंदा गागरे, पुणे, डॉ. सुचेता गंधे, सौ. सोनलताई दगडे, रूपाली पवार, हरिभाऊ चेवले

कार्यक्रमाच्या सुरवातीस व मध्यंतरानंतर स्वरानंद म्युझिकल इवेंट्स ग्रुपतर्फे देशभक्ती पर सुमधुर गीतांचे सादरीकरण झाले, त्यात मुख्य गायिका वैशाली बोकिल, मुख्य गायक ज्ञानेश्वर चौधरी, गायक दिलीप पवार व संजय साळवे यांनी उत्कृष्ट आवाजात गीत सादर केले, बहारदार संगीत कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन सुहासिनी बुरकुले यांनी केले.

या कार्यक्रमास प्रिया सोनार, नेहा ढोकणे, नंदा मोरे, रूपाली सोनवणे, वासंती जगदेव, शंतनू जगदेव, संतोष कुटे, नंदकिशोर शेवाळे, मनुमाणसी महिला संस्था समूह, ऋतुजा पाटील, तनुजा रायते, अनिशा क्षीरसागर. धृव रोकडे, साईराज मतसागर, विवेक पाटील यांची उपस्थिती लाभली, या अभिनव गौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन राजेश आंधळे यांनी केले व ज्योती सोनवणे यांनी पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले.

Previous article“हेमंत शिंदे पत्रकार” कार्यगैारव पुरस्काराने सन्मानित
Next articleगोदामाई प्रतिष्ठान नाशिक च्या वतीने संपादक हेमंत शिंदे यांचा “पत्रकार कार्यगैारव पुरस्कार ” मिळाल्या बद्दल सत्कार