गोदावरी स्वच्छता अभियाना प्रसंगी केला जाहीर सत्कार
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070
गोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने गोदावरी स्वच्छता अभियानाचा 37 वा आठवडा रविवार दि.29 जाने.2023 रोजी संपन्न झाला. मराठी सिने अभिनेते चिन्मयदादा उद्घगीरकर व गोदामाई प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आदिनाथजी ढाकणे यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली होणाऱ्या या अभियाना प्रसंगी हेमंत शिंदे – भूमीराजा न्यूज़ चे नाशिक जिल्हा संपादक व गोदामाई प्रतिष्ठान सदस्य यांचा पत्रकारिता क्षेत्रातील विशेष योगदाना करीता सक्षम ग्राहक जागरूकता मंच व देवयानी ऐड व्हीजन च्या वतीने 26 जानेवारी 74 व्या प्रजासत्ताक दिनी ” पत्रकार कार्यगैारव पुरस्कार ” देवून सन्मानित करण्यात आले होते.
हेमंत शिंदे यांना ” पत्रकार गुणगैारव पूरस्कार ” मिळाल्या बद्दल गोदामाई प्रतिष्ठानचे आबासाहेब देव, नाशिक प्रमुख कार्याध्यक्ष सृष्टी देव, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकिय अधिकारी. शेखर ढेपे, गोदाकाठचा पत्र मित्र. दत्तात्रय कोठावदे, गोदामाई सेवक ए. आर. धोपावकर, राजेंद्र शास्री, नरेंद्र पणशीकर, अतीश दाणी, मयूर गायकवाड, हेमंत शिरोड़े, कु. गैारी देव, संस्कृती देव, यां मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.


