Home कृषीजागर पातूर येथिल एक जून ते सात जून बियाणे महोत्सव

पातूर येथिल एक जून ते सात जून बियाणे महोत्सव

पिंपळ खुटा :- पातूर तालुक्यांतील पालक मंत्री यांच्या संकल्पनेतून व खुल्या बाजारातील बियाणांच्या किंमती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना माफक दरात. व शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादित केलेले बियाणे सहज उपलब्ध व्हावे याकरिता पातूर तालुक्यात 1जून ते 7 जून रोजी तालुका कृषी अधिकारी पातूर यांच्या द्वारे आयोजित बियाणे मोहोत्सव कृषी उत्पन्न बाजार समिती पातूर येथे आयोजित केला आहे . यामध्ये तालुक्यात सर्व शेतकऱ्यांनी आपले उगवण क्षमतेत पात्र असणारे बियाणे घेऊन विक्री साठी घेऊन यावे .जसे सोयाबीन उडिद, मूंग,तुर इत्यादी बियाणे घेऊन यावेत . व जे गरजू शेतकरी आहेत त्यांनी हे बीज शेतकऱ्याकडून विकत घ्यावे शेतकऱ्यांना उगवण क्षमतेचे बियाने माफक दरात मिळेल. व योग्य तो शेतकऱ्यांना याच्या फायदा होईल . यामधून शेतकऱ्यांना योग्य ते उगवण क्षमतेचेव माफक दरात बियाणे मिळेल याच्या सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांनी 1ते 7 जून पर्यंत फायदा घ्यावा असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे

प्रतिक्रिया
तालुक्यांतील सर्व शेतकऱ्यांनी बियाणे महोत्सवामध्ये येऊन चांगल्या उगवण क्षमतेचे बियाणे आणावे आणि ज्यांना आवश्यक आहे अश्या शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करावे व यातून शेतकरयांना चांगल्या उगवण क्षमतेचे बियाणे मिळणार आहे. त्या मुळे तालुक्यांतील सर्व शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा
धनंजय शेटे
तालुका कृषी अधिकारी पातुर

Previous articleबाणाक्षरी
Next articleबाळापूर बसस्थानकात  सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्याची शिवसेना बाळापूर शहराच्या वतीने मागणी