Home Breaking News पत्रकार भवनासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार-आ डॉ राहुल पाटील!

पत्रकार भवनासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार-आ डॉ राहुल पाटील!

आनंद ढोणे पाटील
परभणी :देशपातळीवर पत्रकार आणि पत्रकारितेसाठी वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने ६ जानेवारी २०२३ शुक्रवार रोजी दर्पण दिनानिमित्त परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात व्हाईस ऑफ मीडिया संलग्नीत संघटनेच्या पत्रकारांची कार्यशाळा आयोजित करण्यात येवून यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पन दिन साजरा करण्यात आला. यावेळी परभणी जिल्ह्यातील सव्वाशे पत्रकारांचा दहा लक्ष रुपयांचा कवच विमा संघटनेच्या वतीने मोफत काढून देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ राहुल पाटील बोलताना म्हणाले की, महानगर पालीकेने जागा उपलबद्ध करुन दिल्यास परभणीत पत्रकार भवनसाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देवू असी घोषणा केली़ तर मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पत्रकार भवनला जागा देण्यासाठी मनपा सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.ते पुढे म्हणाले की,पत्रकार बांधव लेखनीच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतात.समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली लेखनी झिजवतात.ते दिवसभर घराबाहेर पडून बातम्या संकलनाचे करत असतात.परंतु त्यांच्याच वयक्तिक समस्या उपेक्षित राहतात.त्यांना उत्पन्नाचे साधन नसल्याने आर्थिक विवंचनेत असतात.त्यांना राहण्यासाठी निट घरही नसते,आर्थिक तरतूदी अभावी मुला बाळांच्या शिक्षणाची सोय नसते.याकरीता त्यांना एखादी हाऊसिंग सोसायटी निर्माण करुन घरे बांधून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्याचबरोबर दुपारनंतर च्या सत्रात बोलताना कार्य सम्राट आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी जागा उपलब्ध झाल्यास गंगाखेड मतदार संघातील पूर्णा,पालम,गंगाखेड या तिनही तालुक्याच्या पत्रकार भवन बांधून देऊ असे आश्वासन बोलताना दिले.त्यांनी पत्रकारांच्या विविध अडचणीवर प्रकाशही टाकून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी कधीही तयार आहे.असेही सांगितले.
व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृह येथे मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दर्पण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार कार्यशाळेत व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, कार्यालयीन सेक्रेटरी दिव्या पाटील, आमदार डॉ रत्नाकर गुट्टे, आमदार डॉ राहुल पाटील, संघटनेचे राज्य सहसरचिटनिस ज्ञानेश्वर भाले, संघटनेच्या महिला संघटक स्वप्ना कुलकर्णी, युवा उद्योजक पंडित राठोड, माजी नगरसेवक सचिन देशमुख, नगरसेवक फारुख बाबा, संस्थाध्यक्ष शिवसांभ सोनटक्के यासह आदींची उपस्थिती होती.
यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी, पत्रकारांच्या हाऊसिंग सोसायटीसाठी आपण जिल्हाधिका-यांना बोलणार असल्याचे आ डॉ राहूल पाटील म्हणाले. मनपावर प्रशासक असल्याने पत्रकार भावनसाठी जागा देणे सहज शक्य असल्याचे आमदारांनी सुचविले़ यावेळी मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर पत्रकार भवनला जागा देण्यासाठी मनपा प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगितले.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आपल्याला कुण्या पत्रकार संघटनेचे उणे धुणे काढण्यापेक्षा पत्रकारांसाठी सकारात्मक पद्धतीने कृतीशील काम करायचे आहे. पत्रकार सक्षम झाले पाहिजेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे़ त्यांना शासकाकडून मोफत घरे मिळाली पाहिजे यासाठी संघटना काम करीत असल्याचे काळे म्हणाले. यावेळी संस्थेच्या कार्यालयीन सेक्रेटरी दिव्या पाटील यांनी संस्थेचा अजेंडा मांडला.
तर जिल्ह्याभरातील सव्वाशे पत्रकारांचा आरोग्यविमा उतरविण्यात आला. यावेळी उपस्थित जिल्हा प्रतिनिधींचा सन्मान संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर भाले यांची संघटनेच्या राज्य सहसरचिटणीसपदी तर पत्रकार सूरज कदम यांची संघटनेच्या राज्य कार्यवाहकपदी निवड झाल्याबद्दल संघटनेत स्वागत करण्यात आले. तसेच पत्रकार कैलास चव्हाण यांचे संघटनेत स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी परीश्रम घेण्यात आले. पदाधिका-यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच परभणी जिल्ह्यातील पूर्णा, पालम,गंगाखेड,जिंतूर,सोनपेठ,मानवत, पाथरी सह अन्य तालूक्यातील संघटनेच्या सर्व पदाधिका-यांना संघटनेचे आयकार्ड, निवडपत्र, भेटवस्तू आणि पत्रकारांना विमा पॉलिसी देण्यात आली.कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन प्रसाद जोशी यांनी तर आभार प्रदर्शन मारोती जुंबडे यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी प्रवीण चौधरी, गणेश लोखंडे, अमोल लंगर, श्रीकांत देशमुख, सुधीर बोर्डे, प्रदीप कांबळे, देवानंद गुंडाळे,अक्षय मुंडे, विठ्ठल भिसे, सय्यद युसूफ, सुदर्शन चापके, शेख मुबारक, राजन मंगरुळकर, संतोष गवळी, भास्कर लांडे, डी के इनामदार, गणेश पाटील, संतोष मगर, विजय कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, अर्जुन जाधव आदींनी विशेष प्रयत्न केले.
——-
तीन पत्रकार भवनसाठी निधी देणार: आ रत्नाकर गुट्टे
——-
गंगाखेड विधानसभा मतदार संघातील तीनही तालुक्यात आपण पत्रकार भवनसाठी निधी देऊ, यासाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करुन द्यावी. पत्रकारांनी जागा सुचविल्यास आपण पत्रकार भवनसाठी शासनाकडून निधी मिळवून देवू. गरीब पत्रकारांना घरे मिळाली पाहिजेत, यासाठी संदीप काळे हे व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी जे काम करीत आहेत ते अत्यंत महत्वाचे आहे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे शेवटी म्हणाले.

Previous articleथंडीचा कडाका वाढला!
Next article” भारतीय जनता पार्टी तर्फे पत्रकार दिन साजरा…