Home Breaking News ” भारतीय जनता पार्टी तर्फे पत्रकार दिन साजरा…

” भारतीय जनता पार्टी तर्फे पत्रकार दिन साजरा…

👉 तालुक्यातील पत्रकार बांधवांचा केला यथोचित सन्मान!

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 06 जानेवारी 2023

*हिमायतनगर येथील श्री क्षेत्र परमेश्वर मंदिर येथे, महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक पहिले मराठी वृत्तपत्रकार , संपादक, महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक, संशोधक दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस 6 जानेवारी हा संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून, *भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांच्या आदेशाने भारतीय युवा मोर्चा तालुका अध्यक्ष यांच्या तर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिर यय सभागृहात पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनानिमित्त एक पेन व पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला…*
*यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील,तालुका अध्यक्ष आशिष भाऊ सकवान, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, सिरंजनी येथील सरपंच पवन करेवाड, मंगरूळ येथील सरपंच जिवन जैयस्वाल, सरचटनीस वामनराव पाटील मिराशे, उपशहर अध्यक्ष बालाजी ढोणे सह भारतीय जनता पार्टी तर्फे उपस्थित होते यावेळी हिमायतनगर तालुक्यातील सर्व पत्रकारांना पेन पुष्पहार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला * यावेळी मंदिर कमेटीचे संचालक शांतीलाल श्रीश्रीमाळ, नरवाडे काका, संचालक तथा उपतालुकाप्रमुख शिवसेना विलासमामा वानखेडे, दिनेश राठोड आदी सामाजिक कार्यकर्ते व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.

Previous articleपत्रकार भवनासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार-आ डॉ राहुल पाटील!
Next articleपाचशिव महादेव ( पार्श्वनाथ) यात्रेतील कुस्तीस्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न.