Home समाजकारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा निमित्त नाशिक मध्ये थेट जनसंपर्क अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा निमित्त नाशिक मध्ये थेट जनसंपर्क अभियान

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

31 मे रोजी अहिल्यादेवी होळ कर यांच्या जयंती निमित्त नाशिक मध्ये जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्या करीता युवा नेते समाधान बागल व जेष्ठ नेते मा. खंडेराव पाटील यांच्या नेतृत्वात पंचवटी, सातपुर, सिडको, नाशिकरोड या विभागात थेट जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे.
या अभियानातर्गत शिवाजी गार्डन सीबीएस येथे होणारे अभिवादन व महाप्रसाद, शिवाजी गार्डन ते रामघाट मिरवणुक, संध्याकाळी गोदाआरती व अहिल्यादेवी आरती व युवा व्याख्याते मा. गणेश शिंदे यांचे व्याख्यान या कार्यक्रमाची निमंत्रनाची पत्रिका देऊन समाज बांधवांना, भगिनीना जन्मोत्सव सोहळात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात येत आहे.
समाज बांधव व भगिनी या देखील तन, मन, धनाने या सोहळ या मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे.
या अभियाना मध्ये हेमंत शिंदे, वैभव रोकडे, श्याम गोसावी या आयोजन समिति च्या पदाधिकारी सह अनेक समाज बांधव, भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे.

Previous articleरासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी अस्मानी संकटात.
Next articleनाथ समाजाचे भव्य मेळावा आयोजन….