Home Breaking News रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी अस्मानी संकटात.

रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी अस्मानी संकटात.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
दिनांक – 19 मे 2022

भारत हा कृषिप्रधान देश आहे. असे आपण नेहमीच म्हणतो. कारण आपल्या भारत देशातील 80 ते 85 % टक्के जनता हि शेतीवर अवलंबून आहे. भारतातील बहुतांश राज्यातील शेतकरी हे शेतीवर आणि शेतीपुरक व्ययसायावर अवलंबून आहेत.
नांदेड जिल्ह्यातील आणि संबंधित तालुक्यात शेतीविषयी लागणा-या निविष्ठाची खरेदी विविध कृषि सेवा केंद्रावर दिसुन येत आहे. यामध्ये रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले आहेत. सोयाबीन बियाण्याच्या बॅगची किंमत 3750 ते 4050 रुपये प्रतबॅग आहे. त्यामध्ये काही कंपन्यांनी 27 किलो सोयाबीन भरले आहेत. गतवर्षी 30 किलोची बॅग होती. आणि युरीयाचे एक पोतं 45 किलो भरले आहे. त्यामध्ये 5 किलो युरिया का? कमी कंपनीने भरला. त्या कंपनीच्या मालकाला किंवा सोयाबीन बॅगमध्ये का? कमि भरले यांना भ्रमणध्वनीवर विचारायची कुण्या तालुक्यातील संबंधित तालुका कृषी किंवा पंचायत समिती कृषि अधिका-याची हिंमत होईल का? असा थेट सवाल तालुक्यातील शेतक-यांनी केला आहे.
प्रभारी तालुका कृषी अधिकारी हे स्थानिकचे आहेत. त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी खत, बियाणे यांच्या वाढते भाव. या विषयी प्रतिप्रश्न विचारला असता. त्यांचे उत्तर गोलमोल असेच होते.
एका प्रसिद्ध वृतमान पत्राचे संपादक म्हणत होते. अक्कल नाही त्यांने शेती करावी…‌ कृषि सेवा केंद्र वाल्यांची मनमानी, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषि अधिकारी यांचे गोलमाल उत्तर , माल पुन्हा मिळत नाही म्हणून संभ्रमात असलेले शेतकरी, सरकारचे कृषिविषयक धोरण म्हणजे “घर का ना घाट का” अश्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली तर.. शेतकरी जगेल. अन्यथा शेतकऱ्यांच्या गळ्यात पडलेल्या दोरीचा फास बघितल्यावर त्या क्षणी एवढेच म्हणावे लागेल….. कर्जबाजारी होता तो……….

Previous articleनसरोद्दिन शहा वली यांचा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पोलिस स्टेशन तर्फे संदल काढण्यात आला..!
Next articleपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा निमित्त नाशिक मध्ये थेट जनसंपर्क अभियान