Home Breaking News दिघी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ५३ वा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात...

दिघी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ५३ वा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा ….

१०० दीप प्रज्वलित करून शाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले…

हिमायतनगर प्रतिनिधी :- कृष्णा राठोड

तालुक्यातील दिघी येथे आज दिनांक १८ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ठिक ६ वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मित्र मंडळ दिघी आणि सामाजिक कार्यकर्ते तथा ( पत्रकार ) मा. गंगाधर गणपत गायकवाड यांच्या वतीने साठे नगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ५३ व्यावी स्मृतिदिनानिमित्त साठे नगर येथे सर्व प्रथम साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस दिघी येथील सरपंच सौ. छाया बंडु गायकवाड आणि मातंग समाजातील जेष्ठ नागरिक श्री गणपत पिराजी गायकवाड, यांच्या हस्ते प्रतिमेची पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी गावातील जेष्ठ नागरिक व नवयुक मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते व मातंग समाजातील नागरिक व महिला मंडळी व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मा. गंगाधर गणपत गायकवाड, लक्ष्मण गायकवाड,किसन, सुनिल गायकवाड,बबन गायकवाड, बंडु गायकवाड, प्रकाश सावते, खंडू गायकवाड, शिवाजी गायकवाड,पांडुरंग गायकवाड,आर्जुन गायकवाड, यांच्या उपस्थितीत स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला मंडळी व गावातील जेष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सह आदी जणांची यावेळी उपस्थित होती.

Previous articleशहरात मुसळधार पावसामुळे नदी ला पुर
Next articleमन प्रकल्प व उतावळी प्रकल्प भरल्या मुळे शेतकऱ्यानं मध्ये आनंदाचे वातावरण