Home Breaking News योगेश काईतवाड यांची पोलीस उपअधिक्षक पदी निवड!

योगेश काईतवाड यांची पोलीस उपअधिक्षक पदी निवड!

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक -19 जानेवारी 2024

हिमायतनगर तालुक्यातील मौजे तिर्थक्षेत्र बोरगडी येथील एकेकाळी कुस्तीचा आखाडा गाजविणारे व सध्या पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक नांदेड येथे कार्यरत असलेले दत्ताजी काईतवाड यांचे धाकटे चिरंजीव योगेश दत्ताजी काईतवाड यांनी अभ्यासात अतिशय जिद्द, आणि चिकाटी ठेवत हे यश प्राप्त केले आहे. मागील वर्षी मुलाखती मध्ये थोडक्यात अपयश आल्याने त्यांनी खचुन न जाता पुन्हा जिद्दीने अभ्यास करून पोलीस उपअधीक्षक या पदासाठी यशाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. त्यांनी या यशाचे श्रेय आईवडील, गुरु यांना दिले आहे.

Previous articleहिमायतनगर येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकांची प्रशासकीय मान्यतेनुसार लातूर येथे बदली..
Next articleसवना गावच्या पोलीस पाटील पदी माधव अनगुलवार यांची निवड!