Home Breaking News जालना येथील घटनेच्या निषेधार्थ वाडेगाव बंद

जालना येथील घटनेच्या निषेधार्थ वाडेगाव बंद

सकल मराठा समाज व विविध सामजिक संघटनाचा वतीने पुढाकार

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी

वाडेगाव:-सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ वाडेगाव मध्ये कडकडीत बंद ठेवण्या आला आहे.
या संदर्भात वाडेगावात सर्व प्रतिष्ठित नागरिक ,विविध सामाजिक संघटना,वंचित बहुजन आघाडी,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, विविध पक्षाचे पदाधिकारी आदी सर्व समाज बांधव यांनी पाठींबा देऊन पूर्ण गावातून फेरी काढून व्यापारी व व्यवसायीक यांना सुचना देऊन प्रतिष्ठन बंद ठेवून कडकडीत बंद ठेवण्यात आला ..यावेळी सर्वांनी प्रतिसाद मिळाला असल्याने कडकडीत बंद ठेवण्यात आला.या मध्ये ग्राम प्रशासन तथा सकल मराठा समाज व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जालना जिल्ह्यातील सावरा या ठीकाणी मराठा समाजाचे आरक्षण मिळाव ,या मागणी साठी उपोषणाला बसणारे बांधव यांच्यावर लाठीचार्ज झाल्यामुळे , घडलेल्या विचीत्र घटनेमुळे निषेध करतांना घोषणा बाजी करीत सरकारचा निषेध करण्यात आला. आरक्षण मिळाव यासाठी शहर काँग्रेस पक्ष,वंचित बहुजन आघाडी, मुस्लीम संघटन, आदींनी सहभाग घेतला व झालेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यात आला.

Previous articleसकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
Next articleप्राचार्य श्री प्रदिप सांगळे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार