Home Breaking News डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,...

डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर येथे ” स्वच्छता भारत अभियान 2.0″ चे आयोजन.

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
बाळापूर – 19ऑक्टोबर 2022 स्थानिक डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बाळापूर येथे ” स्वच्छता भारत अभियान 2.0″ या कार्यक्रमा चे आयोजन मा. प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर सर यांच्या मार्गदर्शना मध्ये करण्यात आले.युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय नवी दिल्ली तसेच मा. संचालक राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती यांच्या निर्देशनुसार महाविद्यालयांच्या रा. से. यो पथका द्वारे स्वच्छता भारत अभियान 2.0 राबविण्यात आले. या कार्यक्रमा मध्ये बहुसंख्य रा. से. यो. स्वयंसेवक उस्फुर्तपणे सहभाग घेऊन जवळपास 19.50 किलो प्लास्टिक गोळा करण्यात आले.या अभियानामध्ये प्रा. सुनिल देशमुख, डॉ. राजेश ओळंबे, डॉ. संजय पाटील, डॉ. शैलेंद्र चव्हाण डॉ. अनंत खर्चे इत्यादी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीयांनी सहभाग घेतला. स्वच्छता अभियान यशस्वी करण्या करिता प्रा. पुरुषोत्तम बाठे रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी, डॉ. जयश्री भिसे सह कार्यक्रम अधिकारी व प्रा. आल्हाद भावसार यांनी अथक परिश्रम घेतेले.

Previous articleराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था शाखा बुलढाणा जिल्हा अंतर्गत *” एक दिपावली गरजू वंचितांसाठी “* उपक्रम
Next article*पीकविमा तक्रार आणि समज-गैरजमज एक चिंतन!