Home Breaking News राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था शाखा बुलढाणा जिल्हा अंतर्गत *” एक दिपावली...

राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था शाखा बुलढाणा जिल्हा अंतर्गत *” एक दिपावली गरजू वंचितांसाठी “* उपक्रम

अँकर शितल शेगोकार भूमीराजा प्रतिनिधी

आज दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी, राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दीपावलीच्या सणानिमित्त संस्थेचे संस्थापक श्री.देवा तांबे सर यांच्या संकल्पनेतून आयोजित *” एक दिपावली गरजू वंचितांसाठी “* या सामाजिक उपक्रमा अंतर्गत, संस्थेच्या शाखा बुलढाणा जिल्हा महिला अध्यक्षा शितल शेंगोकार मॅडम व बुलढाणा जिल्हा टीम यांच्या नेतृत्वाखाली ,तसेच बुलढाणा अध्यक्षा यांचे भाऊ वैभव प्रसंगीत निर्वाण यांच्या वाढदिवसानिमित्त,संस्थेच्या वतीने *” एक दीपावली गरजू वंचितांसाठी “* अंतर्गत शेगाव – भीम नगर परिसरातील तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड या ठिकाणी असलेले गरजूंना संस्थेच्या वतीने कपडे वाटप तसेच दिवाळीचे काही फराळ वाटप करण्यात आले.
संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींना विनंती करते की आपणही या कार्यात आपल्या जिल्ह्यातून,तालुक्यातून सहभागी व्हावे

Previous articleबस कर रे पावसा.
Next articleडॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर येथे ” स्वच्छता भारत अभियान 2.0″ चे आयोजन.