Home Breaking News बस कर रे पावसा.

बस कर रे पावसा.

बस कर रे पावसा येऊ नको आता,माझ्या शेतकरी राजाने तुझ्यापुढे झुकविला माथा..||धृ||

मूलबाळ बघती वर जेव्हा पाहिजेत होता, पेरणीसाठी पाहिली वाट तेव्हा येत नव्हता
बस कर रे पावसा येऊ नको आता, माझ्या शेतकरी राजाने टेकविला माथा ||१||

काय सांगू तुला सोयाबीन झालं ओलं,
कापूस होता दही झाला मट्टी मोल बस कर रे पावसा येऊ नको आता माझ्या शेतकरी राजाने नमविला तुझ्यापुढे माथा कर्ज काढून काढून आम्ही हिमतीने पेरलं तुझं सांग बाप्पा आता हाती काय उरलं बस कर रे पावसा येऊ नको आता माझ्या बळीराजांनी टेकविला तुझ्यापुढे माझा माथा ||२||

काळी माती बीज जेव्हा उगवलं, माझ्या शेतकरी बापान किती स्वप्न रंगवलं,
बस कर रे पावसा येऊ नको आता माझ्या बळीराजांनी टेकविला माथा||३||

उपाशीपोटी राहून मर मर मेला, तोंडाशी आलेला घास तोही तू हिसकावून नेला,
बस कर रे पावसा येऊ नको आता माझ्या शेतकरी भूमी राजाने टेकविला तुझ्यापुढे माथा||४||

उन्हात पावसात राबराबुनी करतो आटापिटा,
आशा होती शासनाची त्याही बंद झाल्या वाटा,
बस कर रे पावसा येऊ नको आता माझ्या शेतकरी राजाने तुझ्यापुढे माथा||५||

आशा आरोग्य कार्यकर्त्या ,
सौ.रजनी विजयराव जुमळे, हिंगणा (उमरा) 9921688204
ता.खामगाव जि. बुलढाणा
प्रा.आ.केंद्र
बोथाकाजी

Previous articleपरतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे उरले सुरले उभे पिक लुटले !
Next articleराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था शाखा बुलढाणा जिल्हा अंतर्गत *” एक दिपावली गरजू वंचितांसाठी “* उपक्रम