Home Breaking News परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे उरले सुरले उभे पिक लुटले !

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे उरले सुरले उभे पिक लुटले !

शेतकरी शेमजुरांची दिवाळी अंधारात.

नासिर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी

शेतकरी,शेतमजूर,कामगार,व सरकारी नौकरशहा या सर्वांचा आनंदोत्सव असणारा दीपावली सण नेमका आठ दिवसांवर येऊन ठेपला असतांना साहजिकच प्रत्येकाला सदर सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याची इच्छा होत असते.परंतु आर्थिक अभावी व वाढलेल्या महागाईमुळे दीपावली सण साजरा कसा करावा हा प्रश्न शासकीय नौकर शहांना नक्कीच पडला नसेल.कारण त्यांना शासनाकडून महागाई भत्याचा आधार मिळत असतो.त्यामुळे या मंडळींचा विचार कुणाला येणार नाही. खरा प्रश्न आहे तो,शेतकरी,शेतमजूर,कामगार आदींचा कारण महागाई कितीही होवो यांना कोण देणार महागाई भत्ता?खरा प्रश्न आहे शेतकरी शेतमजुरांचा कारण शेतकऱ्यांनी सोयाबीनवर एकरी बारा हजार रुपये खर्च करून तीन महिने वीस दिवस काबाडकष्ट करून पिकवलेल्या सोयाबीनने नुकताच गृहप्रवेश करताच बाजार समित्यांमध्ये असलेले पाचहजार पाचशे रुपये असणारे सोयाबीनचे दर गरगर खाली उतरून (४०००)चार हजार ते (४२००)बेचाळीसेवर आलेत.त्यात जुलै ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये वरून राजाने अवकृपा करीत धोधो पाऊस ओतून शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकासह शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी खचल्याने बऱ्याच प्रामानामध्ये पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा सत्यानाश केला.झालेल्या नुकसानीचे पंचनामे संबंधित प्रशासनाने करावे म्हणून तालुक्यातील विविध संघटनांकडून निवेदनाद्वारे मागणी करून उपयोग झाला नाही.

आणि तालुक्यातील पातूर मंडळातील चार गावे वगळता, संपुर्ण तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी लाभापासून वंचित राहले.सोयाबीन काढणीच्या तयारीत शेतकरी वर्ग असतांना दि १७- १८ ऑक्टोबर दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी तीन चार क्विंटलचा उतारा येत असल्याने बाजारातील सोयाबीनची किंमत लक्षात घेता शेतकऱ्यांच्या हातामध्ये येणारी रोकड ही उधार उसनवारी फेडण्यात जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दीपावली सण साजरा कसा करावा. आणि पुढील रब्बीपिकाची पेरणी पैशा अभावी कशी करावी असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत.सदर गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज बाजारी होण्याशिवाय पर्याय उरला नाही.हे स्पस्ट दिसून येत आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या गंभीर बाबीकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सदर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी लाभापासून वंचित राहल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

प्रतिक्रिया
शेतकऱ्यांची वाट बिकट

अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली परंतु परतीच्या पावसामुळे सदर पांदण शेतरस्ते चिखलमय झाल्यामुळे मळनियंत्र शेतात जात नसल्यामुळे, व ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवले ते शेतातच पडून असल्याचे शेतकरी प्रमोद हरमकार यांनी सांगितले.

सोयाबीनपेक्षा बियाणे महागडे!

गतवर्षी अनेक शेतकऱ्यांनी गरजेपोटी घरचे सोयाबीन विकून घरघुती व रब्बी पीक पेरणीच्या गरजा पूर्ण केल्या त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना कृषिसेवा केंद्रामधून विविध जातीच्या ३० किलो सोयाबीनच्या एक बॅगला ३५०० ते ४००० रुपये मोजावे लागले.मात्र सद्या त्याच सोयाबीनची बाजार समित्यांमध्ये ४००० ते ४२०० रुपये क्विंटल दराने खरेदी सुरू आहे.

Previous article*चिमुकल्यासह महिलेचा मृत्यू*
Next articleबस कर रे पावसा.