Home गुन्हेवृत्त अखेर… लाचखोर प्रकरणात सचिव राजेंद्र मेहरे निलंबित

अखेर… लाचखोर प्रकरणात सचिव राजेंद्र मेहरे निलंबित

१.२७ लाख रुपयांची लाचेची मागणी करणे भोवले

नासिर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी

पिंपळ खुटा : पातुर पंचायत समिती अंतर्गत राहेर अडगाव ग्राम पंचायतचे लाचखोर सचिव राजेंद्र श्रीराम मेहरे याला अखेर.. मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी २२ जून रोजी निलंबित केले आहे. कंत्राटदारांनी केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी लाचखोर सचिव राजेंद्र मेहरे व सरपंच राजेश्री बोराडे यांचे पती अशोक बोराडे या दोघांनी एक
लाख २७ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी ८ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पातुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली होती. कंत्राटदाराने गट ग्राम पंचायत राहेर अडगाव अंतर्गत पिंपळखुटा परिसरात पाझर तलाव शेत रस्त्याच्या कामावर बांधकाम साहित्याचा पुरवठा केला होता. या कामाच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी सचिव राजेंद्र मेहरे व सरपंच पती अशोक बोराडे यांनी एक लाख २७ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केली होती. पातुर बाळापूर मार्गवरील एका रसवंतीवर लाचेची रक्कम स्वीईकारण्याचे ठरले होते, परंतु तक्रारदारावर संशय आल्याने अशोक बोराडे यांनी त्या ठिकाणाहून पळ काढल्याने लाचेची रक्कम स्वीईकारली नाही, त्यामुळे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सचिव राजेंद्र मेहरे व सरपंच पती अशोक बोराडे यांना गुन्हा दाखल करून अटक केली होती. या प्रकरणी अखेर लाचखोर सचिव राजेंद्र मेहरे याला २२ जून रोजी निलंबित करण्यात आले असून, त्यांचे मुख्यालय तेल्हारा पंचायत समिती देण्यात आले आहे.

Previous articleखासदार संजय जाधव आणि आमदार डॉ राहूल पाटील यांच्या रुपाने परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला कायम!
Next articleपळसपुर गावातील दोन दिवसांपासून विज पुरवठा खंडीत