Home Breaking News भोकर विधानसभेच्या धर्तीवर, हिमायतनगर तालुक्याचा विकास का? होऊ नये!

भोकर विधानसभेच्या धर्तीवर, हिमायतनगर तालुक्याचा विकास का? होऊ नये!

👉 थेट जनतेच्या मनातील प्रश्न

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 04 डिसेंबर 2022

महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, लोकनेते, नांदेड जिल्ह्याचे मा. पालकमंत्री, भोकर विधानसभेचे विद्यमान आमदार, लोकप्रिय नांदेड जिल्ह्याचे लाडके नेतृत्व मा. ना. अशोकराव चव्हाण साहेब यांनी आपल्या भोकर मतदार संघाचा विकास केला. तसा हिमायतनगर – हदगाव तालुक्यातील खासदार, आमदार आपल्या मतदारसंघात विकास करणे, हे अपेक्षित आहे. अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
भोकर मतदार संघात प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीचे पांदण रस्ते आज रोजी डांबरीकरण होतांना दिसतायेत. तसेच मोठमोठ्या नाल्यावर प्रचंड मोठमोठे पुल तयार होत आहेत. सिंचनासाठी विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. ईतकेच नव्हे तर भोकर शहरातील सिंमेट रस्ते 5 ते 6 फुट उंच, त्यामध्ये मोठा पाईप टाकून, अंडरग्राऊंड पाणी जाण्याची व्यवस्था केली आहे. ईतकेच नव्हे तर मोठ मोठे उडांन पुल, बायपास रस्ता, अशी विविध करोडो रुपयांची कामे आज रोजी पुर्ण होतांना दिसत आहेत. शेतकरी, मजुर, सर्व सामान्य माणसाला आपल्या नेत्यांचा विकास दिसत आहे.
म्हणूनच अशोकराव चव्हाण साहेब यांचे नांव भोकर मतदारांच्या ह्रदयात घर करुन बसले आहे.

तसेच हिमायतनगर-हदगांव तालुक्याला अजुनतरी शेतकऱ्यांच्या शेतीला रस्ता देणारा नेता मिळाला नसुन, मोठमोठे पुल अर्धवट अवस्थेत गुत्तेदारांचे घर भरण्यासाठी बांधले आहे की, काय? असा सवाल थेट विद्यमान लोकप्रतिनिधीना जनता विचारत आहे. किमान शेतकरी, कष्टकरी, मजुर यांना शेतकऱ्यांना शेतीला रस्ता, आरोग्याच्या सोईसुविधा, दर्जेदार शिक्षण, सिंचनाच्या सुविधा, दिवसां १२ तास शेतकऱ्यांच्या शेतीपंपाना विजेचा पुरवठा यापैक्षा शेतकऱ्यांना ईतर काही अपेक्षीत नाही. महावितरण कंपनीने आपले बिल वसुलीचे काम केलेच… लोकप्रतिनिधींनी कितीही आरडाओरडा करून शेवटी काय झाले…… महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे यावर्षी प्रचंड अतिवृष्टी होऊन सुद्धा 3000-/रुपये शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे चालु विजबिला पोटी अतिशय सुरक्षीत घेतले आहे. याठिकाणी लोकप्रतिनिधींचे कितपत महावितरण कंपनीने ऐकले, हाही मोठा गहन प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांना पडतो आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघात जसा विकास होऊ शकतो. तसा हिमायतनगर-हदगांव मतदारसंघात विकास व्हावा. हिच अपेक्षा जनतेच्या मनात आहे. भोकरचा जसा विकास होऊ शकतो तर मग हिमायतनगर-हदगांव चा होऊ नये, अशी तिखट प्रतिक्रिया जाणकार शेतकरी बांधवांनी बोलुन दाखवली आहे.

Previous articleहुंडयासाठी सासरच्यां मंडळींकडून शारीरीक व मानसिक छळ;
Next articleबाबुसिंग पवार यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश