Home कविता तळपत्या उन्हात

तळपत्या उन्हात

करपतय रान तनमनाचं
पेटतोय वैशाख वणवा.
वाराही चोरून आहे अंग
पडून नुसता उताणा.

आग ओकतोय सूर्य
भाजून निघतेय सृष्टी.
भाळपासून तळापर्यंत
जीव उन्हाने होतो कष्टी

झाडे ही मक्ख उभी
सळसळ विसरून पाने.
तळपत्या उन्हात कसे
पक्षांना स्पुरेल गाणे.

मैलोन मैल वाट तुडवती
पोरीबाळी, लेकुरवाळी.
घोटभर पाण्यासाठी फक्त
माथी चढल्या चुंबळी.

झुल्याच्या दोन दोऱ्या
अंबावृक्ष बांधलेल्या.
शीतल छाया वृक्षाखाली
थोड्याश्या नांदलेल्या.

कल्पना देवळेकर मापुसकर
मिरारोड,ठाणे

Previous articleसृजनाचा ऋतुराज
Next articleमाणसाची संख्यात्मक वाढ झाली, पण गुणात्मक वाढ नाही.