Home कविता 🌹*माझी शाळा*🌹

🌹*माझी शाळा*🌹

आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ!!

त्यावर करतो
तांब्यानी प्रेस,
तयार आमचा
शाळेचा ड्रेस!!

खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग!!

धोतराचं फडकं
आमचं टिफीन,
खिशात ठेवुन
करतो इन!!

करदोडा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?

मिरचीचा ठेचा
लोणच्याचा खार,
हाच आमचा
पोषण आहार!!

रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज!!

काट्यांच रूतणं
दगडांची ठेच,
कसा सोडवायचा
हा सारा पेच!!

मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट!!

जुन्या पुस्तकांची
अर्धी किंमत,
शिवलेल्या वह्यांची
वेगळीच गंमत!!

पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची!!

साप्ताहिक भुमी राजा न्युज
जिल्हा संपादक नांदेड
मो. 9763126813

Previous articleकळमनुरी मतदार संघात कोंग्रेस पक्षाला “जोर का झटका धिरेसे”…..
Next articleआण्णाभाऊ साठे हे शोषणमुक्त समाजनिर्मितीच्या चळवळीतील सरदार – *संतोष आंबेकर*