Home Breaking News आण्णाभाऊ साठे हे शोषणमुक्त समाजनिर्मितीच्या चळवळीतील सरदार – *संतोष आंबेकर*

आण्णाभाऊ साठे हे शोषणमुक्त समाजनिर्मितीच्या चळवळीतील सरदार – *संतोष आंबेकर*

भूमिराजा न्युज शहर प्रतिनिधी,
कृष्णा राठोड -9145043381

हिमायतनगर/-
लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी आण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचा केंद्रबिंदु हा शोषण, अन्याय, अत्याचार विरहित समाज हाच राहिला आहे. त्यांची प्रत्येक कलाकृती, त्यांच्या कथा-कादंबरी मधील नायक, नायिका जनतेला शोषणाच्या विरोधात लढा उभारण्याचं सामर्थ्य प्रदान करणारे आहेत. आणि विषेश‌ म्हणजे त्यांनी फक्त थंडगार बसुन काल्पनिक काही लिहीलं नाही तर आपलं संपुर्ण आयुष्य कामगार चळवळीत खर्ची घातलं आहे. त्यांनी जे भोगलं, जे उघड्या डोळ्यांनी बघितलं तेच आपल्या साहित्यात शब्दबद्ध केलं आहे. ज्याला आपण वास्तववादी साहित्य म्हणु शकतो. ज्यामुळे ही शोषणमुक्त समाजनिर्मितीची चळवळ गतीमान झाली असं आपण म्हणु शकतो. म्हणुन मला आण्णाभाऊ साठे हे शोषणमुक्त समाजनिर्मितीच्या चळवळीतील सरदार वाटतात. असे मत सोसायटी संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष आंबेकर यांनी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. सरपंच प्रतिनिधी जीवन जैस्वाल,उपसरपंच आनंद पेंटेवाड, मुख्याध्यापक खिराडे सर, फुंदे सर, बालाजी पावडे ग्रा.पं. सदस्य, मारुती सोमनवाड ग्रा.पं. सदस्य, मारुती कुंजरवाड, विठ्ठल सुदलवार, दत्तरामजी जललवाड, दयाकर सुदेवाड, चंद्रकांत सोमवाड, पुंडलिक दासरवाड, विकास बोरकर,गिरीश कुंजरवाड,शिवाजी आंबेकर, मारुती आचकुलवार मूर्तिकार,भगवान पाईकराव, भारत पाईकराव यांची प्रमुख उपस्थिती होती तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम आंबेकर, प्रवीण आंबेकर, अंकुश आंबेकर,करण आंबेकर, चंद्रकात गवळी, गजानन कुंजरवाड. सिद्धार्थ आंबेकर गजानन रुद्र बोईनवाड रुशीकेश जयस्वाल सतीश रुद्र बोईनवाड आदींनी परिश्रम घेतले. .

Previous article🌹*माझी शाळा*🌹
Next articleराशन दुकानदारांचे तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी