Home Breaking News महापरिनिर्वाण दिनाला २२ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा परिणाम...

महापरिनिर्वाण दिनाला २२ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा परिणाम वाईट होतील-

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101

योगेश घायवट तालुका प्रतिनिधी बाळापुर 

अकोला, दि. २३ – विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे महापरिनिर्वाण दिनाला विदर्भ महाराष्ट्रसह २२ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला आहे.मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या लाईनसाठी जळगाव स्थानकात यार्ड, रिमॉडेलिंगचे काम सुरू करण्यात आले आहे.या कामासाठी जाणीवपूर्वक ५ व ६ डिसेंबर २०२२ रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. म्हणून हावडा ते मुंबई मार्गावरील विदर्भ एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्स्प्रेससह अप व डाऊन अशा ३८ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हा निर्णय संतापजनक असून हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा अन्यथा देशभर ह्याचा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नसल्याचा इशारा वंचित बहूजन युवा आघाडी महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.
जगभर विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमी येथे अभिवादन करायला येत असतात ह्याची जाणीव असतांना रेल्वेच्या वतीने हा निर्णय घेऊन आंबेडकरी अनुयायांना वेठीस धरण्याचा डाव आखला आहे.केंद्र सरकारने हया निर्णयाचा पुनर्विचार करावा, आंबेडकरी अनुयायांच्या भावनांशी खेळ करू नये असे आवाहन देखील युवा आघाडीने केले आहे.
हे प्रकार सहन केले जाणार नसून रद्द करण्यात आलेल्या २२ गाड्या अकोला रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या असल्यामुळे आंबेडकरी अनुयायी आणि इतर प्रवाशांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी हा बिनडोक आणि द्वेषपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.

Previous article
Next articleहिंदी माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश