Home कविता अनमोल जीवनाचा हिशोब काय ठेवायचा।

अनमोल जीवनाचा हिशोब काय ठेवायचा।

काळाच्या निरंतर वाहत्या                              प्रवाहा मध्ये..
आपल्या थोड्या वर्षांचा..
हिशोब काय ठेवायचा ..

आयुष्याने भर भरून                                      दिले असताना..
जे नाही मिळाले त्याचा..
हिशोब काय ठेवायचा..! !

मित्रांनी दिले आहे,
अलोट प्रेम इथे…
तर शत्रूंच्या बोलण्याचा,
हिशोब काय ठेवायचा..!!

येणारा प्रत्येक दिवस,
आहे प्रकाशमान इथे..
तर रात्रीच्या अंधाराचा,
हिशोब काय ठेवायचा..!!

आनंदाचे दोन क्षण ही,
पुरेसे आहेत जगण्याला..
तर मग उदासिनतेच्या,
क्षणांचा..
हिशोब काय ठेवायचा..!!

मधुर आठवणींचे क्षण,
इतके आहेत आयुष्यात..
तर थोड्या दु:खदायक गोष्टींचा..
हिशोब काय ठेवायचा..!!

मिळाली आहेत फुले इथे,
कित्येक सहृदा कडुन..
मग काट्यांच्या टोचणीचा..
हिशोब काय ठेवायचा..!!

चंद्राचा प्रकाश आहे,
जर इतका आल्हाददायक..
तर त्यावरील डागाचा..
हिशोब काय ठेवायचा..!!

जर आठवणीनेच होत असेल,
मन प्रफुल्लित ..
तर भेटण्या न भेटण्याचा..
हिशोब काय ठेवायचा..!!

काही तरी नक्कीच.                                        खुप चांगलं आहे सगळ्यांमधे..
मग थोड्याशा वाईटपणाचा,
हिशोब काय ठेवायचा..!!

अंगद सुरोशे हिमायतगर मो .९५२९३७८२२५

Previous article।। फुलला पळस ।।
Next articleशायकीय योजना शेतकर्यांनसाठी खरेच वरदान आहेत का ?