Home कविता ।। फुलला पळस ।।

।। फुलला पळस ।।

निसर्गाच्या सानिध्यात
कसा ” फुलला पळस “
लाल केसरी रंगाने सजला
दिसे शोभून पळस…।।

देतो होळीची चाहूल
येईल रंग उधळण
आसमंतात दिसतो जसा
येता फुलांनी सजून…।।

गळले सर्वच पानोपान
फुले आलीय देठोदेठी
मुलांना हर्ष वाटतो जेंव्हा
बांधून शिमग्याची गाठी…।।

रंगरंगाची उधळण करा
आरोग्य ही सांभाळा
नका करू धिंगामस्ती
वाद विकोपही टाळा…।।

रानं फुलले फुलांनी
मने सुगंधाने फुलवा
येवोत कितीही संकटे
प्रेमाने झुला झुलवा…।।

सुभाष वि. दांडगे, अकोला
७६२००३२२८३

 

Previous articleशीतल शेगोकार यांना नाशिक येथे महाराष्ट्र पर्यावरण भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.
Next articleअनमोल जीवनाचा हिशोब काय ठेवायचा।