Home समाजकारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती माझी आत्मकथा हे जीवनचरित्र पुस्तक,वही व पेन वाटप...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती माझी आत्मकथा हे जीवनचरित्र पुस्तक,वही व पेन वाटप करून साजरी

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा जयंती निमित्त अभिप्रेत अभिनव उपक्रम-

कार्यकारी संपादक  निलेश हिवराळे
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांची 131वी जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जीवनावर आधारित माझी आत्मकथा पुस्तक, वही व पेन साहित्य मोफत वाटपाचा कार्यक्रम टी.के.व्ही.चौक पातूर येथे आयोजित केला होता. ह्यावेळी 500 गरजू शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास रुपी साहित्याचा वाटप करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांना अभिप्रेत अभिवादन केले. जेणेकरून विद्यार्थी हा शैक्षणिक दृष्ट्या विचारांचे पुस्तक वाचेल व यशस्वी होईल हा संकल्प ठेवून हा कार्यक्रम १४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ ह्या वेळेत आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे यांनी केले होते. तरी कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक पातूर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार हरिष गवळी साहेब ह्यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रि .पा.ई. तालुका अध्यक्ष सागर इंगळे,हरिष गुडधे,ग्रा.पं सदस्य मंगल डोंगरे,निलेश हिवराळे, सुरेंद्र अवचार,वैभव अवचार,शुभम हिवराळे,रुपेश अवचार,अमर हिवराळे,हर्षल सिरसाट, कुणाल उमाळे,शुभम धाडसे,धनंजय सरदार,शुभम खंडारे, उज्ज्वल अवचार,अमर हिवराळे,रोहन हिवराळे, कपिल वानखडे,सचिन हिवराळे, आनंद हिवराळे,आदित्य अवचार,पवन तांबे,तुषार इंगळे,बंडू गुडधे,पूजा हिवराळे रुचिका चुनोळे, आदींसह असंख्य जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनिळा सूर्य….
Next articleतालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षउत्साहात साजरी.