Home Breaking News तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षउत्साहात साजरी.

तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षउत्साहात साजरी.

जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 14 एप्रिल 2022

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येक खेडेगावात, कार्यालय, व बौद्धविहारात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली आहे. यावेळी पंचशिल झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ट्रॅक्टरवर बाबासाहेबांची मोठी प्रतिमा ठेवुन गावांमध्ये रॅली काढण्यात आली. ढोलताशा चार गजरात मिरवणूक काढण्यात आली.
👉 सवना ग्रामपंचायत कार्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपसरपंच सौ. चंद्रकलाबाई सोनबा राऊत यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी सरपंच परमेश्वर गोपतवाड, तंटामुक्त अध्यक्ष कैलास अनगुलवार, सिध्दार्थ राऊत, संदिप बिरकलवार, रमाबाई राऊत, सुलोचनाबाई राऊत, नंदु राऊत, संजय राऊत, परमेश्वर संगणवाड, परशुराम विठ्ठलवाड, संतोष अनगुलवार, बालाजी आलेवाड,भारत गुंडेवार, पत्रकार मारोती अक्कलवाड व सर्व बौध्द बांधव आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous articleडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती माझी आत्मकथा हे जीवनचरित्र पुस्तक,वही व पेन वाटप करून साजरी
Next articleडाॅ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी दहा लाखाचा निधी. 👉 आमदार मोहनराव हंबर्डे