Home Breaking News शिक्षक भारतीच्या अल्टीमेटमची दखल

शिक्षक भारतीच्या अल्टीमेटमची दखल

विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-र्यासाठी मान्यतेचे 20% व 40%प्रमाणे पत्र देण्याचे आदेश

हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

शिक्षक भारती या संघटनेने दिलेल्या अल्टीमेटची दखल घेत प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी सर्व विनाअनुदानित शाळाना अनुदानाचे 20 व 40% टक्के प्रमाणे देण्यात आलेल्या मान्यतेचे पत्र पारित करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षक भारतीच्या इशा-
यामुळे विना अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय मिळाला आहे. सर्व शाळाना अनुदानाचे 20% व 40%टक्के मान्यतेचे पत्र तात्काळ पारित न केल्यास आंदोलनाचा इशारा शिक्षक भारती संघटनेने दिला होता.
याच बरोबर पदाधिका -यानी सोमवारी शिक्षणाधिकारी फुलारी यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी शिक्षक भारतीचे समन्वयक के. के. अहिरे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे, जिल्हाध्यक्ष साहेबराव कुटे, आश्रमशाळा सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, शहर अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनायक लाड़, मालेगाव तालुका उपाध्यक्ष प्रशांत पवार, व पिडीत संस्थाचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. शिक्षण अधिकारी यांच्या दालनामध्ये बैठक होऊन या बैठकीत सकारात्मक निर्णय घेवून संघ टनेची मागणी मान्य करण्यात आली.

Previous articleप्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याच्या १३ एप्रिलपासून जिल्ह्यात २५ एप्रिलपर्यंत केवळ ३६८ बालकांचा प्रवेश निश्चित झाला आहे
Next articleदाेन बाजार समित्यांसाठी मतदान सुरू