Home Breaking News ।। पेन्शन सुरू कराना…।।

।। पेन्शन सुरू कराना…।।

सरकार आमचे मायबाप हो
आमची दैना समजून घ्या ना
घरात उपाशी मरतील पोरं
अन् बायको घालणार धिंगाणा…।।

म्हणते त्या आमदार खासदाराले पेन्शन
तुम्ही काय करता वं शाळेत बसून
लढा दया जीवन मरणाचा आता
म्हातारपणाची सोय आपली लावाना…।।

जुनी पेन्शन पोटाच साधन
ते हिरावून घेतलं सरकारनं
आमची जुनी पेन्शन सुरु करा
नाहीतर तुमची पेन्शन बंद कराना…।।

नाही पसरत आम्ही झोळी
दया हक्काची आमच्या शिदोरी
मरेपर्यंत मागे सरणार नाही
जुनी पेन्शन आम्हाला दया ना…।।

म्हातारपणाची काठी आहे म्हणा आमची
नंतर पोरं आहेत कोण कुणाची
फेकतील उघड्यावरती नाहीतर
पाठवतील अनाथाश्रमांना…।।

आता म्हणा कदर येवू दया आमची
जुनी पेन्शन दया हो आम्हाला हक्काची
शेवटी विनं करतो हा सुभाष
दैना आमची समजून घ्या ना…।।

सुभाष वि. दांडगे, अकोला
७६२००३२२८३

Previous articleपुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय महिला सन्मान सोहळा व कवी संमेलन आणि फॅशन शो
Next articleजिल्ह्यात गारासह अवकाळी पाऊस!