👉 आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या विकास निधीतुन झाले काम, भाविकांत समाधान.
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 16 एप्रिल 2022
अनेक भाविक भक्तांचे कुलदैवत असलेले इतिहास कालीन श्री सिध्देश्वर मंदिर सवना येथील सभागृहांचे काम पुर्ण झाले आहे.
हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतुन दहा लाखांचा निधी दिला होता. सवना ज संरपंच परमेश्वर गोपतवाड यांच्या प्रयत्नातून या सभागृहांचे काम पुर्ण झाले आहे.
तालुक्यातील नव्हे, तर संबंध जिल्ह्यातुन सिध्देश्वराचे दर्शन घेणा-या भाविकांनी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
आज महाप्रसादाचे आयोजन केले असुन, अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.
या श्री सिध्देश्वर मंदीराच्या परीसरात पाण्याचा बोअर देऊन, भाविकांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबवावी, अशी मागणी मंदिरांचे मुख्य पुजारी गणेशराव भुसाळे सवनेकर यांनी केली आहे.