Home Breaking News विहीरीमध्ये पाय घसरून पडल्याने पळसपुर येथील शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यु

विहीरीमध्ये पाय घसरून पडल्याने पळसपुर येथील शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यु

हिमायतनगर प्रतिनिधी /(अंगद सुरोशे भुमीराजा न्युज )

पळसपुर येथील अल्पभुधारक शेतकरी बालाजी किसनराव कदम हे आपल्या शेतामध्ये फवारणी करण्यासाठी विहीरीतुन पाणी काढत होते. पाणी काढत असताना पायाखाली असलेला दगड ढासळल्याने शेतकऱ्याचा विहीरीत तोल गेला पोहणे ऐत नसल्यामुळे शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली आहे.
हिमायतनगर तालुक्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे शेतातील विहीरी तुडुंब भरून वाहत आहेत. पळसपुर येथील शेतकरी बालाजी किसनराव कदम वय (45) हे आपल्या शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी विहीरीतुन पाणी काढत होते. पाणी काढत असतांना विहीरीच्या दरडीचा दगड ढासळल्याने शेतकऱ्याचा तोल पाण्यात गेला शेतकऱ्यास पोहणे ऐत नसल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. 5 जुलै रोजी घडली आहे. शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी,आई,भाऊ असा परिवार आहे.या घटनेची माहिती मयत शेतकऱ्याच्या भावाने पोलीस ठाण्यात दिली आहे.हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात प्रेताचे श्वछचेदन करून सायंकाळी 8 वाजता पळसपुर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सदरील शेतकऱ्यावर अचानक घटनेने दुर्दैवी मृत्यू झाल्याने पळसपुर गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous articleनिसर्गप्रेमींनी केले जांभूळ बेटावर वृक्षारोपण
Next articleमहामार्गावर वाहनधारकांना करावी लागते कसरत !