Home Breaking News महामार्गावर वाहनधारकांना करावी लागते कसरत !

महामार्गावर वाहनधारकांना करावी लागते कसरत !

👉 सार्वजनिक बांधकाम विभाग
दखल घेईल का?

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 06 जुलै 2022

भुमी राजा न्युजच्या बातमीची दखल घेत थातुरमातुर, माथुर पुलाच्या दोन्ही बाजूला मुरुम, माती टाकली खरी. पण प्रत्यक्षात त्याचा चिखलात रुपांतर होऊन, मोटारसाईकल चालवितांना जिव मुठीत धरून गाडी चालवावी लागत आहे.
पुलाच्या बाजुचे दोन्ही कटडयाचे बांधकाम अपुरेच आहे. सकाळी सकाळी वाहणाची गर्दि आणि रात्री पाऊस पडल्यामुळे खुपच चिखल झाला आहे.
सहा महिन्यांपूर्वी सुरुवात झालेले काम अजुन पुर्ण होत नाही. सवना ज. ग्रामपंचायतचे मा. सदस्य लक्ष्मणराव गायकवाड यांनी शेतकाकडुन येत असतांना, पुलाचे काम करणाऱ्या गुत्तेदार वर ताशेरे ओढले.
या भागातील लोकप्रतिनिधी का? आतापर्यंत गप्प बसून राहिले. कुठ पाणी मुरत आहे. हाही महत्त्वाचा मुद्दा त्यांनी बोलुन दाखवला आहे.

👉 सावधानतेचा इशारा देणारा
फलक चक्क झाडावर टांगला.

कोणत्याही कामाची सुरुवात करतांना तिथे लोखंडी फलक हा दोन्ही बाजूला लावला जातो.
परंतु येथे लावलेला पुठयावर एक बॅनेर लावुन चक्क पळसाच्या झाडावरच लावला गेला.
पुलांचे काम वेळेत पूर्ण होत नसल्याने आजुबाजुच्या शेतकऱ्यांचे पाण्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे.
याला कोण जबाबदार आहे.
येत्या दोन दिवसांत या फुलांच्या दोन्ही बाजूला गिटटी टाकुन, पक्का रस्ता नाही बनवल्यास मी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करु अशा इशारा लक्ष्मणराव गायकवाड सवनेकर यांनी आमच्या प्रतिनिधींना बोलुन दाखवला.

Previous articleविहीरीमध्ये पाय घसरून पडल्याने पळसपुर येथील शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यु
Next articleपरभणी जिल्ह्यात तूर्तास समाधानकारक पाऊस, पिकांना मिळतेय जिवदान!