Home Breaking News पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा बैठक संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा बैठक संपन्न

हेमंत शिंदे – नासिक जिल्हा संपादक भूमीराजा

31 मे या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी साजऱ्या होणाऱ्या सोहळ्याची बैठक सकल धनगर समाज नाशिक जिल्हा यांच्या वतीने शनिवार दि.30 एप्रिल रोजी नाशिक मधील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील हुतात्मा स्मारका मध्ये घेण्यात आली.
या बैठकी मध्ये नाशिक मधील मध्यवर्ती सीबीएस बसस्थानका समोरील शिवाज़ी उद्यान मधील अहिल्यादेवी चा पुतळा ते अहिल्या पटांगण गोदाघाट या दरम्यान ढ़ोल ताशा, आदिवासी नृत्यासह काढण्यात येणाऱ्या मिरवणुक तसेच शिवाजी उद्यानात साजऱ्या होणाऱ्या सर्व पक्षीय अभिवादन व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमा च्या आयोजना बाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला समाधान बागल, सन्नी गायकवाड, अण्णा सापनर, हेमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे,वैभव रोकडे, लक्मण बर्गे, विजय चितळकर, संदीप देवकाते, निलेश तासकर, बाबूराव हिंगे आदि सह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Previous articleगोर सेनेचा क्रांतिकारी मोर्चा मुंबईत धडकणार ……
Next articleसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम संघटनेची विदर्भस्तरीय बैठक अमरावती येथे संपन्न.