Home Breaking News रमणवाडी तांडा येथे तिव्र पाणी टंचाई. 👉 नागरीकांना शेतावरुन आणावे लागते पाणी..

रमणवाडी तांडा येथे तिव्र पाणी टंचाई. 👉 नागरीकांना शेतावरुन आणावे लागते पाणी..

जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक-26 एप्रिल 2022

हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकघरी- रमणवाडी तांडा येथे गट ग्रामपंचायत असलेल्या मुळे , रमणवाडी तांडा येथील नागरिकांना तळपत्या उन्हात पिण्यासाठी पाणी आणावे लागते. हि वस्तुस्थिती आहे. गावातील बोअरवेल बंद असुन, गावाजवळ असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरी वरील मोटार चालू केल्या केल्या, तिथे नागरीकांची प्रचंड गर्दी दिसून येते. रमणवाडी तांडा येथील सर्वच पाण्याचे स्त्रोत आटले असुन ग्रामपंचायत कार्यालय एक महिन्यापासून पाणी उपलब्ध करून देत नाही. तसा प्रयत्न करत नाही. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दोन दिवसांत पाणी उपलब्ध करून नाही दिले तर, पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर येथे सर्व महिला, पुरुष यांचा घाघर मोर्चा काढण्यात येणार आहे. असे ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले आहे.

Previous articleइंटरसिटी रेल्वेखाली आल्याने दोन तुकडे होऊन झाला युवकांचा मृत्यू; सर्वत्र हळहळ
Next articleअपघातग्रस्त स्व.गौतम राऊत यास आर्थिक मदत…