Home Breaking News कारला ग्रामपंचायतीचे काम गावातील जनतेसाठी प्रेरणादायी……. प्रा.मारोती देवकर

कारला ग्रामपंचायतीचे काम गावातील जनतेसाठी प्रेरणादायी……. प्रा.मारोती देवकर

हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला गावातील शेतकरी नागरिकांचे प्रश्न गावापातळीवर सुटत असुन ग्रामपंचायत च्या माध्यमातून ग्रामस्थ शेतकऱ्यांना अधिकारी वर्ग गावात भेट देऊन कामे करून मिळत आहेत नागरिकांचा वेळ वाया न घालवत हि कामे होत असल्यामुळे ग्रामपंचायतचे कामकाज हे गावासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रा .मारोती देवकर यांनी व्यक्त केले

भारतीय स्टेट बँक कडून शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप होणार आहे. शेतकऱ्यांना बँकेत दिवसभर फिरावे लागत होते. परंतु बँकेचे शाखा अधिकारी आखाडे व सरपंच गजानन कदम यांनी गावातील शेतकऱ्यांना बँकेत न पाठवता सर्व शेतकऱ्यांना सोईचे होईल यासाठी ग्रामपंचायत मार्फत पिक कर्ज फार्म देण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दुर केली.

दि. 7 जुन रोजी कारला ग्रामपंचायत येथे पिक कर्जाच्या फाईल बँकेचे फिल्ड आफीसर अभय कोलगे, प्रतिक चहांदे , यांनी गावात ऐऊन पिक कर्जाच्या फाईल ची पडताळणी केली. ग्रामपंचायत मार्फत फाईल देऊन शेतकऱ्यांच्या समस्याचे गावातच निराकरण केले. यामुळे सध्यातरी ग्रामपंचायत कडून लोकहिताची कामे होत असल्याचे प्रा.मारोती देवकर यांनी कौतुक केले. पुढे बोलतांना देवकर म्हणाले की

कारला गावातील नागरिक लोकप्रतिनिधी गावातील सार्वजनिक हितासाठी व गावातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी एकत्र होऊन गावगाडा घेऊन चालतात हि अनेक वर्षापासूनची परंपरा आजही तरुण सरपंच ,उपसरपंच सदस्यांच्या कामातून दिसत आहे. पोलीस पाटील कै. विठ्ठलराव लुम्दे यांनी अनेक वर्षे गावात सर्व धर्म समभाव ठेवून लोकहिताची कामे केली होती.
त्यांच प्रमाणे आजही गावातील तरुण गावच्या विकासात्मक कामासाठी प्रयत्न करतांना दिसत त्याचीं हि धडपड गावच्या हितासाठी असल्यामुळे ग्रामपंचायत सरपंच सदस्यांचे काम प्रेरणादायी आहे भविष्यात अशीच परंपरा कायम टिकून ठेवून जनहिताची कामे व्हावेत असेही प्रा मारोती देवकर यांनी व्यक्त केले.
यावेळी स्टेट बँकेचे अभय कोलगे फिल्ड आफीसर , प्रतिक चहांदे , सरपंच गजानन कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ गफार, सदस्य सोपान बोंपीलवार, शिवाजी एटलेवाड,गजानन मिराशे, तुकाराम कदम, भिमराव लुम्दे, मारोती जुकूंटवाड,चंद्रकांत घोडगे, आनंद रासमवाड, उत्तम रासमवाड, आक्षय मोरे, साहेबराव घोडगे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Previous articleपरभणी जिल्ह्यातील निसर्गरम्य जांभूळ बेटावर यंदा घेण्यात येणार वृक्ष लागवड कार्यक्रम!
Next articleहिमायतनगर परिसरातील अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी फोफाळली.