Home राजकारण थेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडीचा निर्णय झाल्याने ग्रामीण जनता खुश!

थेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडीचा निर्णय झाल्याने ग्रामीण जनता खुश!

परभणी, (आनंद ढोणे) :- महाराष्ट्र राज्यातील खेड्यातील ग्रामविकास लक्षात घेता फडणवीस-शिंदे सरकारने यापुढे पाच वर्ष पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड ही थेट जनतेतून होणार असल्याचा निर्णय घेतल्याने खेडेगावातील नागरीक खुश झाल्याचे पहावयास मिळत आहे. या पूर्वी देखील सरपंच-नगराध्यक्ष पदाच्या निवडीचा निर्णय हा जनतेतून होता. परंतु, मध्यंतरीच्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निर्णयास स्थगिती दिली होती. मात्र, “देवाची करणी अन् नारळात पाणी” म्हणून की काय, नवनिर्वाचित भाजपा शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्याने हा निर्णय घेण्यात आला.सध्याच्या फडणवीस-शिंदे सरकारने सरपंच पदाची निवड थेट जनतेतून घेण्याचा निर्णय नूकताच घेतला गेला आहे.तसे निर्देश निवडणूक विभागाकडून आल्यानंतर हे निश्चित होईलच.या निर्णयामुळे सरपंच पदासाठी सर्वांगीण विकासाची नाळ अंगी असणाऱ्या उमेदवाराची निवड होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकात सदरील निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. शिवाय,ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्यांपैकी ज्याची सरपंच पदासाठी निवड करायची आहे? त्यासाठी होणारा मोठा घोडेबाजार थांबेल. तसेच थेट जनतेतून निवडला जाणारा व्यक्ती हा सरपंच पदावर राहून गावात विकासाची चांगली कामे करेल. या व्यतिरिक्त त्या सरपंचाच्या विरोधात अविश्वास दर्शवता येणार नाही. यामुळे हा निर्णय ग्राम विकासाच्या दृष्टीकोनातून स्तूत्य उपकृम असल्याचे ग्रामीण भागातील जनता बोलून दाखवीत आहे.

Previous articleमहावितरणचे कर्मचारी अतिवृष्टी मध्येही जीवाची पर्वा न करता बजावले आहे आपले कर्तव्य
Next articleअतिवृष्टीमुळे बेघर झालेल्या कुटुंबांना शासनाने तातडीची मदत द्यावी.. डाॅ.अब्दुल गफार कारलेकर…