Home राजकारण ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत पैनगंगा व पूर्णा नदीवरील बंधाऱ्यांचा मुख्यमंत्री वॉर रुम प्रकल्पात...

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत पैनगंगा व पूर्णा नदीवरील बंधाऱ्यांचा मुख्यमंत्री वॉर रुम प्रकल्पात समावेश खासदार हेमंतभाऊ पाटील

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत पैनगंगा व पूर्णा नदीवरील बंधाऱ्यांना दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या कॅबिनेट बैठकीत प्रशासकीय मान्यतेसह सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. परंतु या बंधाऱ्यांची कामे आणखी जलद गतीने आणि तातडीने पूर्ण करण्यासाठी या बंधाऱ्यांचा समावेश मुख्यमंत्री वॉर रुम प्रकल्पात करण्यात यावा अशी मागणी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे करण्यात आली होती यास मा. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने मंजुरी देऊन पैनगंगा व पूर्णा नदीवरील बंधाऱ्यांचा समावेश मुख्यमंत्री वॉर रुम प्रकल्पात केला आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील मागास व आदिवासी बहुल भागातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ त्वरित मिळवून देण्याच्या दृष्टीने ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत येणारे पांगरा , बनचिंचोली , गोजेगाव, घारापुर , किनवट , मारेगाव , धनोडा आणि उनकेश्वर तसेच पूर्णा नदीवरील जोडपरळी , ममदापुर, पिंपळगाव कुटे या बंधाऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. मुख्यमंत्री वॉर रुम प्रकल्पात समावेश झाल्यामुळे या बंधाऱ्यांची कामे तातडीने आणि जलदगतीने पूर्ण करण्यात येतील व लवकरच हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला याचा लाभ होणार आहे

Previous articleपशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याची गोमाता दगावली; नुकसान भरपाई देण्याची मागणी …..
Next articleलोकनेते बाबुराजी कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने रखडलेले घरपडीचे 2022 चे अनुदान लाभार्थ्यांना वाटप