Home महाराष्ट्र लोकमतच्या त्या बातमीत तथ्य नाही; राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील

लोकमतच्या त्या बातमीत तथ्य नाही; राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील

दैनिक लोकमतने ऑनलाईन प्रसिद्धीस दिलेली बातमी माझ्या वाचनात आली. बातमीत दिल्याप्रमाणे कोणतेही तथ्य नसून मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबतच आहे. पवार साहेबांच्या सोबत असणारे आम्ही सर्व आमदार साहेबांच्या विचारधारेवर ठाम आहोत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कने आपल्या वृत्तात म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जयंत पाटील यांना आपल्या गटात खेचून आणण्याच्या हालचाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने सुरू केल्या असल्याची खात्रीलायक माहिती आहे. मात्र, दैनिक लोकमतने ऑनलाईन प्रसिद्धीस दिलेली बातमी कोणतेही तथ्य नसल्याचे जयंत पाटील यांनी ट्विट करून सांगितले आहे.

Previous articleTest
Next articleमानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!…