Home Breaking News हिमायतनगर पोलीस ठाण्यात आज पोळा -गणेशोत्सव सनानिमित्त शांतता बैठक संपन्न!

हिमायतनगर पोलीस ठाण्यात आज पोळा -गणेशोत्सव सनानिमित्त शांतता बैठक संपन्न!

सर्वधर्म समभावाचा आदर करत आगामी उत्सव साजरे करा – उप.वि.पो.नि. अर्चना पाटील

प्रतिनिधी,रविकुमार पवार
खडकीकर – ७३५०३३३४१५

हिमायतनगर /- रविकुमार पवार खडकीकर
आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोळा व गणेश उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस स्थानकात शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीस गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती तेव्हा बोलतांना पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती अर्चना पाटील यांनी गावकऱ्यांना असे सांगितले की आपल्या शहरातील जातीय सलोखा कायम ठेवून येणाऱ्या काळातील सण व उत्सव साजरे करा व हिमायतनगर शहरातील पोलीस प्रशासनात सहकार्य करून गावची शांतता कायम ठेवा असे गावकऱ्यांना आव्हान केले व त्यानंतर स्वतः गावातील मुख्य रस्त्याने फिरून गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करून कनकेश्वर तलाव येथील गणेशाचे दर्शन घेत येथील विसर्जन कुंडाची पाहणी केली आहे…

या बैठकीस हिमायतनगर ते तहसीलदार गायकवाड साहेब, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव, महावितरणचे सहाय्यक अभियंता लोणे साहेब, पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी, व हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बि.डी.भुसणुर , सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन नंदलाल चौधरी सह आदी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रथमतः हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी. डी. भुसणुर साहेबांनी उपस्थित गावकऱ्यांना व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना व पोलीस पाटील संघटनांना असे सांगितले की येणाऱ्या आगामी काळातले सर्व उत्सव आपण आपल्या गावात शासनाच्या नियमाप्रमाणे कुठेही सण उत्सव काळात गालगोट न लागता ते साजरे करा असे उपस्थितीताना त्यांना आवाहन केले त्यानंतर उपस्थित सवणा ज चे सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर बोलताना एक दिलगिरी व्यक्त केली की हिमायतनगर शहरासह तालुक्यात आपल्या सण व उत्सवाला गालबोट लागण्याची एकमेव कारण म्हणजे शहरासह तालुक्यात सुरू असलेली अवैध दारू विक्री त्यामुळे प्रशासनाने ही दारू विक्री तात्काळ बंद करण्यासाठी आपल्याच विभागातील कर्मचाऱ्यांना व बिट जमादार यांना सक्त आदेश देऊन प्रत्येक गावातील अवैध दारू बंद करावी अशी विनंती केली त्यानंतर हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टीचे आशिष सकवान, राम सूर्यवंशी, बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल ,विलास वानखेडे यांनी हिमायतनगर शहरात गणेश उत्सव काळा दरम्यान अनेक ठिकाणी रस्ते लाईट व पाण्याचा प्रश्न निर्माण होतो हे या बैठकीत बोलून दाखवले तेव्हा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना गणेश विसर्जन कुंडा संदर्भात गावकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले होते तेव्हा गावकऱ्यांच्या व प्रशासनाचा मेन दुवा असणाऱ्या पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती अर्चना पाटील यांनी हिमायतनगर शहरातील कनकेश्वर तलाव येथील गणेशाचे दर्शन घेऊन येथील विसर्जन कोंडा सह गावातील गणेश विसर्जन मार्गाची स्वतः पायी फिरून पाहणी केली व प्रशासनास ह्या गणेश मंडळाच्या गरजा तात्काळ करून देण्याचे आदेश दिले.

Previous articleप्रधानमंत्री पिकविमा योजना सुविधा केंन्द्राचे उद्घाटन
Next articleगणेश विसर्जन कालावधीत डाॅल्बी, डि. जे सिस्टीम वर बंदी..