Home कृषीजागर आमदार माधवराव पाटील जळगावकर पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर……

आमदार माधवराव पाटील जळगावकर पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर……

प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत देण्याची मागणी…….

हिमायतनगर | कृष्णा राठोड/- तालुक्यात मागील आठ दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त प्रचंड पर्जन्यवृष्टी झाल्याने येथील शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले या मुसळधार झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा येथील शेतकऱ्याला बसल्याने त्यांच्या शेतातील पिकांचे होत्याचे नव्हते झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातून हे खरीप हंगाम पूर्णतः निघून गेला असून त्यांची शेती सुद्धा खरडून गेल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दि 15 जुलै रोजी तालुक्यातील कामारी, वाघी, दिघी, पळसपुर, डोल्हारी ,सिरपल्ली बोरगडी
तांडा , कोठा तांडा, सह आदी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून सोबत असलेल्या महसूल प्रशासनांना ,पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना व कृषी विभागास नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले व हे पंचनामे करताना कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही ह्याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी असे सांगितले .

तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाने थैमान घातले होते काही दिवसापासून हिमायतनगर करांना सूर्यदर्शन सुद्धा झाले नव्हते त्यामुळे आज पावसाची थोडी रीप रिप कमी झाली या पावसाचा सर्वाधिक फटका हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी राजाला बसला असून दुबार तीबार पेरणी करून शेतीतील सोयाबीन कापूस तूर उडीद ,मूग ही पिके आता बहरू लागतच त्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे तर काही ठिकाणी चक्क जमीनीच खरडून गेल्याने शेतकऱ्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने त्यांना शासनाच्या आर्थिक मदतीची गरज निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई देऊन मदत करावी यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी त्यांच्या कडे मागणी केली होती त्यानंतर स्वतः या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दिनांक 15 जुलै रोजी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकांचे पाहणी केली व शेतकऱ्यांशी हितगुज करून तालुक्यातील तहसील कर्मचारी,पंचायत समिती व कृषी कर्मचारी यांना सोबत घेऊन त्यांना आदेशित केले ही तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून ते शासन दरबारी जमा करा त्या पंचनाम्या मध्ये माझं कुठलाही शेतकरी वंचित राहत कामा नये ह्याची आपण काळजी घ्या असे आदेश आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले व उपस्थित शेतकऱ्यांना घाबरु नका मी तुमच्या सोबत आहे असा विश्वास दिला आहे.

Bhumiraja news!
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष दादा राठोड, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रफिक सेठ, माजी काँग्रेस तालुका अध्यक्ष जनार्दन ताडेवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश वानखेडे, शहराध्यक्ष संजय माने, राजू चिकनेपवाड,युवक काँग्रेसचे योगेश चिल्कावार , संतोष शिंदे सह हिमायतनगर येथील तहसीलचे तहसिलदार अवधाने साहेब , पंचायत समिती , कृषी विभाग व पोलीस कर्मचारीयांची सर्व टीम त्यांच्या सोबत उपस्थित होती.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना राजपूत समाजाच्‍या शिष्टमंडळाची भेट
Next articleहिमायतनगर येथील तहसीलदार गायकवाड यांना हृदयविकाराचा झटका..