Home कृषीजागर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना त्वरित मदत करा – संतोष आंबेकर

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना त्वरित मदत करा – संतोष आंबेकर

हिमायतनगर | कृष्णा राठोड
मागच्या ८ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील ग्रामिण भागात प्रचंड नुकसान झाले आहे. कित्येकांची घरे कोलमडुन पडली आहेत तर कोणाची गुरे वाहुन गेली आहेत तर कुणाची गुरे उपासमारीने मरण पावली आहेत. शेतात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने शेताची शेततळे झाले आहेत. त्यामुळे पीक पुर्णपणे वाहुन गेले आहे तसेच त्यासोबत मातीही वाहुन गेली आहे.
त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत तर घरे पडलेल्या नागरिकांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. तर शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशी प्रतिक्रिया संतोष आंबेकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
तरी घरे पडलेल्यांना पंचनामे करुन त्वरित आर्थिक मदत करावी व जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करावे. तसेच रमाई आवास किंवा प्रधानमन्त्री आवास योजनेत या कुटुंबांना प्राधान्य देऊन त्यांना पक्की घरे देण्यात यावी. शेतीचे पंचनामे करून शेतकर्यांना हेक्टरी 50000 रूपये सरसकट आर्थिक मदत करावी. ज्यांची जनावरे वाहून किंवा उपासमारीने दगावली त्यांना पशुधन विकास विभागाच्या योजनेद्वारे जनावरे वितरीत करावी. अन्यथा नागरीकांना प्रशासनाविरोधात संविधानिक मार्गाने आंदोलन करावे लागेल याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल. असा इशारा त्यांनी मा. विनोद राठोड साहेब (नायब तहसिलदार,हिमायतनगर) यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी साहेबराव बोलपेलवाड काँग्रेस कार्यकर्ते,अभिलाश जैस्वाल, केरबाजी सुदेवाड, दिनेश राठोड, खैरगाव ( तांडा)सिद्धार्थ हनवते वारंगटाकळी भारत पाईकराव यांसह तालुका परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Previous articleभारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने तहसीलदारांना निवेदन
Next articleधाराशिव साखर कारखान्याकडून मिळेनात ऊसाची देयके, उत्पादक शेतकरी हैराण