Home Breaking News पोलीस स्टेशन पोलीस हिमायतनगर येथे कार्यरत असणारे सुधाकर लक्ष्मण कदम यांची सहाय्यक...

पोलीस स्टेशन पोलीस हिमायतनगर येथे कार्यरत असणारे सुधाकर लक्ष्मण कदम यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती…..!

हिमायतनगर /-( कृष्णा राठोड ) पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे कार्यरत असलेले सुधाकर लक्ष्मण कदम यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली त्यांच्या निवडीचे पत्र दिनांक 5 सप्टेंबर रोजी मिळाले.

सुधाकर लक्ष्मण कदम हे मूळ हादगाव तालुक्यातील चिखळा गावचे रहिवासी असून अत्यंत गरीब व हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करून ते 1991 मध्ये नांदेड पोलीस भरती मध्ये पात्र झाले. त्यानंतर नागपूर येथे ट्रेनिंग त्यांची पूर्ण झाली यानंतर सर्वप्रथम नियुक्ती त्यांची आदिवासी बहुबल्य भाग असलेल्या किनवट तालुक्यात झाली काही काळानंतर भोकर,हदगाव, इस्लापूर, बदली होत गेली सध्या ते हिमायतनगर पोलीस ठाण्यामध्ये क्राईम विभागासह पोटा या गावचे बीट जमादार म्हणून काम पाहत आहेत चांगल्या पोलीस कर्मचारी म्हणून पोटा परिसरासह हिमायतनगर तालुक्यामध्ये त्यांची जनसंमान्यात ओळख आहे यावेळी त्यांचा सत्कार हिमायतनगर युवा सेना तालुकाप्रमुख योगेश पाटील सोनारीकर, तसेच युवा सेना तालुका उपप्रमुख अजय पाटील, हिमायतनगर पोलीस ठाण्याचे डी एस बी चे अविनाश कुलकर्णी, सरपंच बाळू दवणे, मेंडके हेही उपस्थित होते यावेळी त्यांचा सत्कार डीवायएसपी अर्चना पाटील, तसेच भोकर येथील डी वाय एस पी शेवाळे साहेब, हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बि.डी.भुसनर यांच्याही हस्ते सत्कार करण्यात आला. सुधाकर कदम यांची पदोन्नती मुळे सहकाऱ्यांनी भ्रमणध्वनी द्वारे प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे स्वागत होत आहे.

Previous articleबजरंग गणेश मंडळा तर्फे आयोजन केलेल्या रक्तदान शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….
Next articleई-पीक पाहणीसाठी एक दिवसीय विशेष मोहीम.